26.5 C
New York

Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी सांगितला शरद पवारांचा हळवा क्षण !

Published:

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या बापलेकीची जोडी महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातही प्रसिद्ध आहे. आजपर्यंतच्या राजकीय जीवनात शरद पवार यांनी अनेक संकटाच्या काळात मोठ्या धैर्याने सामोरे गेले. त्यांच्या राजकीय जीवनातील चढउतार आजतायत सुरूच आहेत. पण शरद पवार कायम पहाडासारखे उभे राहिले, आलेल्या संकटांवर त्यांनी कायमआपल्या राजकीय चातुर्याने मात केली, असे राजकीय तज्ञ आणि जाणकार सांगत असतात. पण एक असा क्षण होता जेव्हा शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू आले, ते भावूकही झाले. खुद्द सुप्रिया सुळे यांन तो क्षण सांगितला आहे.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवन संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. पण या बापलेकींच नातंही तितकच खास आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्ट्या’वर नुकतीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची मुलाखत झाली. यावेळी शरद पवार केव्हा भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू कधी पाहिले असा सवाल त्यांना विचारण्यात आला. सुप्रिया सुळेंनी या प्रश्नाला उत्तर दिले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या लग्नाच्या वेळी शरद पवार प्रचंड भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात पाणीही आले होते, असे माझी आई सांगते. विशेष म्हणजे, सुप्रिया सुळे हे सांगत असताना शरद पवार यांनी यावेळीही हात वर करून हो आपण त्यावेळी भावूक झालो होतो, असा दुजोराही दिला.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

त्यानंतर, अजित पवार यांनी आपल्या आमदारांसोबत भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादी काँग्रेसची एक सभाही झाली. या सभेत मी त्या सभेत एक कविता म्हटली होती, ती कविता ऐकून शरद पवार भावूक होते. झाल्याचेही सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितले. शरद पवार यांना बुद्धीबळ खेळ खेळायला आवडतो, बुद्धीबळातील कोणत्या प्याद्यासोबत सर्वात जास्त खेळायला आवडते, असा प्रश्न विचारला असता, शरद पवार म्हणाले, वजीर…

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img