मुंबई
लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Elections) राज्यात जाहीर झालेल्या मुंबई (Mumbai) आणि कोकण (Kokan) पदवीधर (GraduateElection) तसेच मुंबई नाशिक शिक्षण मतदारसंघाकरिता विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council Election) जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीकरिता 29 जून रोजी मतदान करण्यात आले होते. तर आज निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला असून मुंबईचा गड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी राखला आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप आपला गड राखण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) आघाडीवर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पदवीधर संघातील अनिल परब यांना भाजीचे उमेदवार किरण शेलार यांचा 25000 च्या मतांनी पराभव केला आहे. तर कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मोठी लीड मिळाल्याची माहिती मिळत आहे. निरंजन डावखरे यांना तब्बल 58 हजार मतांची लीड मिळाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मुंबईची पदवीधर मतदारसंघाची जागा राखण्यात ठाकरे गटाला, तर ठाण्याची कोकण पदवीधरची जागा राखण्यात भाजपला यश मिळाल्याचं सध्याचं चित्र आहे. याबाबत आता लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी केंद्रीय वखार महामंडळ, गोदाम अंबड येथे पार पडत आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात आहे. मात्र महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार, महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे.