आझाद मैदानाच्या परिसरात असलेल्या अनेक शौचालयांमध्ये पाणी नव्हते. तसेच मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाले. जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) त्यानंतर आता बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिला आहे. पाणी आणि अन्य गोष्टी बंद करणाऱ्या आयुक्तांचे तुम्ही फक्त नाव लिहून ठेवा असे आदेश जरांगे पाटलांनी आंदोलकांना दिले आहेत. त्यामुळे आरक्षण न देणाऱ्या फडणवीसांनतंर जरांगेंच्या टार्गेटवर बीएमसी आयुक्त आले आहेत. आपल्याला हे आंदोलन शांततेत पार पाडून जिंकायचे आहे. गोंधळ घालणाऱ्यांचा काय उद्देश आहे हे मला माहित नाही. पण, त्या गोंधळ घालणाऱ्यांना सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा सध्या शांततेत ठेवा असे आवाहनही जरांगे पाटलांनी आंदोलकांना केले आहे.
Manoj Jarange तुम्ही फक्त नाव लिहून ठेवा
बीएमसी आणि सीएसएमटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे की, शांततेने घ्या. तुम्हाला जेवायला मिळाले नाही. मुख्यमंत्री तुम्हाला पाणी मिळू देत नाहीत. कारण सध्या प्रशासक आहे. त्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा आहे. पण कधी ना कधीतरी वेळ बदलेल. तुम्ही सेवानिवृत्त जरी झाले तरी आयुक्त साहेब तुम्हाला सुट्टी देणार नाही. कारण तुम्ही मराठ्यांच्या पोरांचा पाणी बंद केलं. चांगल्या चांगल्यांची जिरली आहे तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना कधी बदल होत असतो. त्यावेळेला सगळा हिशोब होणार आहे. त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा. बीएमसीचा आयुक्त कोण आहे? असे म्हणत त्यांनी बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिला आहे.
Manoj Jarange मुंबईकरांना त्रास देऊ नका, रस्ता मोकळा करा
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे लाखो मराठ्यांसह मुंबईत दाखल झाले असून, मोठ्या संख्येने आलेल्या आंदोलकांंमुळे मुंबईत विविध भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. या सर्व पार्श्वभूमिवर जरांगे पाटलांनी आझाद मैदानावरून (Azad Maidan) पत्रकार परिषद घेत आंदोलकांना मोठे आदेश दिले आहेत. मुंबईकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नका असे म्हणत त्यांनी बीएमसीचा रस्ता मोकळा करण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी त्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, कायदा मंजूर करा अशी मागणी करत संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला सीएम केलंय, केवळ मुंबईने नाही अशी आठवण फडणवीसांना करून दिली आहे.
Manoj Jarange ते वाईट करणार नाही हा माझा शब्द
मुख्यमंत्र्यांना राजकारणच करायचे आहे, आरक्षण द्यायचे नाही. सर्वांना माझे विनंती आहे की, तुमच्या गाड्या दिलेल्या पार्किंगमध्ये लावा. संयम बाळगा, शांत रहा, आपण वाट बघू. तुमच्या गाड्या सरकारने दिलेल्या मैदानावर लावा. आता सगळ्या मुंबईत मराठे आले आहेत. त्यांनी मुंबईत येऊ नये का? हा माझा शब्द आहेते काही वाईट करणार नाहीत . माझं पोरांना सांगणे आहे की, अजिबात वाईट करायचे नाही. आता सगळ्या मुंबईत मराठी पसरले आहेत. फक्त आपापले वाहने सुरक्षित लावा.
Manoj Jarange संयमाचा अंत पाहू नका
मराठ्यांचा अपमान करू नका, मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका आम्हाला आरक्षण हवंय, राजकारण करायचं नसल्याचे जरांगे म्हणाले. मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या आणि गोंधळ घालणाऱ्यांवर निशाना साधला. ते म्हणाले की, त्यांना काहीही माहिती नसतं. फक्त गोंधळ घालण्यासाठी आलेले असतात. मुंबई न बघितलेल्या पक्षांचे चमचे असल्याचे वक्तव्यही मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.