16.9 C
New York

Reservation : राज्यात कोणाला किती टक्के आरक्षण? मनोज जरांगेंच्या काय आहेत मागण्या

Published:

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Reservation) मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज (29 ऑगस्ट) आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करत आहेत. कालपासून आझाद मैदानात आंदोलकांनी गर्दी करायला सुरवात केली होती, मुंबईसह राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक आझाद मैदानात दाखल झालेले पाहायला मिळत आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून आझाद मैदान आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वारंवार आरक्षणाच्या संदर्भात प्रश्न याच पार्श्वभूमीवर पडतो तो म्हणजे राज्यात कोणाला कीती प्रमाणात आरक्षण आहे.

Reservation राज्यात कोणाला किती टक्के आरक्षण

सध्या महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती 13 टक्के, अनुसूचित जमातींना 7 टक्के, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी 19 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमातींना 11 टक्के, विशेष मागासवर्गाला 2 टक्के, हा एकत्रित आकडा 52 टक्के इतका होता. यानंतर 10 टक्के मराठा आरक्षणाची भर 2024 मध्ये पडली होती. त्यामुळे सध्य़ा राज्यातील आरक्षण 62 टक्क्यांवर आहे. यामध्ये केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू केलेल्या 10 टक्के आरक्षणाचा समावेश केल्यानंतर आरक्षणाची टक्केवारी 72 टक्क्यांवर पोहोचली आहे. मात्र, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

Reservation मनोज जरांगे यांच्या प्रमुख पाच मागण्या काय आहेत

  1. मराठा कुणबी, कुणबी मराठा हे एकच आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.
  2. हैदराबाद गझेटियर लागू करा, ही मनोज जरांगे यांची दुसरी महत्त्वाची मागणी आहे. मागील 13 महिन्यापासून सरकारचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. आम्हाला हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटियर लागू करावे.

3.दीड वर्ष सगे सोयरेचा अध्यादेश काढून झाले, त्याची अंमलबजावणी तरी होत नाही. सगे सोयरेची व्याख्या दिली आहे. कुणबी नोंद ज्याची सापडली आहे, त्याचे सगे सोयरे घ्या, आईकडील नातेवाईक देखील सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, मनोज जरांगेंनी अशी मागणी केली आहे.

  1. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी आहे. आम्हालाच पोलीसांनी ठोकले आणि आमच्यावरच केसेस झाल्या. अजून गुन्हे मागे घेण्यात आलेले नाही. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांच्या कुटुंबियांसाठी सरकारने काहीही केलेले नाही. असेही मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे.
  2. कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आणि आमचे हक्काचे आरक्षण मराठा समाजाला द्या अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img