मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आज मुंबईतील आझाद मैदानात (Mumbai Azad Maidan) उपोषण सुरू केले आहे. उपोषण सुरू करण्याआधी त्यांनी येथे लाखोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या समाजबांधवांना संबोधित केले. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घ्यायची (Maratha Reservation) नाही असं जरांगे पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. त्यांच्या या आंदोलनाला विविध समाजघटकांतून मोठा पाठिंबा मिळाला आहे. तसेच राजकीय वर्तुळातूनही या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला कोणत्या नेत्यांनी पाठिंबा दिलाय याची माहिती घेऊ या..
Manoj Jarange Patil राष्ट्रवादी शरद पवार गट
उत्तम जानकर, आमदार माळशिरस
नारायण आबा पाटील, आमदार करमाळा
बजरंग सोनवणे, खासदार बीड
संदीप क्षीरसागर, आमदार बीड
Manoj Jarange Patil राष्ट्रवादी अजित पवार गट
विजयसिंह पंडीत, आमदार गेवराई
प्रकाश सोळंके, आमदार माजलगाव
राजेश विटेकर, आमदार पाथरी
राजू नवघरे, आमदार वसमत
Manoj Jarange Patil शिवसेना उबाठा
ओमराजे निंबाळकर, खासदार धाराशिव
कैलास पाटील, आमदार धाराशिव-कळंब
संजय उर्फ बंडू जाधव, खासदार परभणी
डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदारा सांगोला (शेकाप)
Manoj Jarange Patil काय म्हणाले जरांगे पाटील?
माझ्या समाजाला किंमत द्या, असं आवाहन त्यांनी सरकारला केलं आहे. पोलीस बांधव नाराज झाले नाही पाहिजे, बऱ्याच जणांना वाटले होते येणार नाही. पण मराठे मांडी घालून बसले. सरकारच्या हातात आहे. परवानगी देणं, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलोय. सरकार आपल्याला सहकार्य करत नव्हतं, त्यामुळे मुंबईला आलो. मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागे हटायला तयार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही.
मुख्यमंत्री साहेब, मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला केवळ आरक्षण हवंय. जेलमध्ये टाकलं तरी, आमरण उपोषण करीन. परंतु, मराठ्यांच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय मागे हटणार नाही. सरकारने गोळ्या घेतल्या तरी मागे हटणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज आझाद मैदानातून सरकारला दिला.
मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. सरकार आपल्याला सहकार्य करत नव्हते म्हणून मुंबईत आलो. आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आभार. मुंबई जाम झाली आहे, दोन तासात मोकळी करा. पोलीस सांगतील तिथे गाड्या लावा, पोलिसांना सहकार्य करा. कोणताही पोलीस आपल्यावर नाराज झाला नाही पाहिजे. सरकारला थोड्या वेळात पुन्हा अर्ज करू, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.