16.9 C
New York

Manoj Jarange Patil : सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही! आझाद मैदानातून मनोज जरांगे पाटलांची गर्जना…

Published:

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आता मुंबईत मोठी झळाळी मिळाली आहे. अखेर आझाद मैदानावर मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे दाखल झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने (Maratha Morcha) आंतरवली सराटी येथून सुरू केलेला मोर्चा मुंबईपर्यंत पोहोचला असून, आझाद मैदानात प्रचंड गर्दी उसळली आहे.

Manoj Jarange Patil बलिदान द्यायला तयार

यावेळी माझ्या समाजाला किंमत द्या, असं आवाहन त्यांनी सरकारला केलं आहे. पोलीस बांधव नाराज झाले नाही पाहिजे, बऱ्याच जणांना वाटले होते येणार नाही. पण मराठे मांडी घालून बसले. सरकारच्या हातात आहे. परवानगी देणं, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलोय. सरकार आपल्याला सहकार्य करत नव्हतं, त्यामुळे मुंबईला आलो. मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागे हटायला तयार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही.

मुख्यमंत्री साहेब, मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला केवळ आरक्षण हवंय. जेलमध्ये टाकलं तरी, आमरण उपोषण करीन. परंतु, मराठ्यांच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय मागे हटणार नाही. सरकारने गोळ्या घेतल्या तरी मागे हटणार नाही. – मनोज जरांगे, मराठा आंदोलक

Manoj Jarange Patil हजारो आंदोलक आझाद मैदानावर

आंदोलकांनी आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसर अक्षरशः भरून गेला आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण दणाणून गेले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी दहा वाजता उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यासाठी हजारो आंदोलक आधीपासूनच मैदानावर दाखल झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात जरांगे यांचे स्वागत करण्यासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.

Manoj Jarange Patil मुंबईत मराठा समाजाच्या ताकदीचे भव्य दर्शन

संपूर्ण परिसरात इतकी गर्दी आहे की पाऊल टाकायलाही जागा शिल्लक नाही. संभाव्य कायदा-सुव्यवस्थेच्या अडचणी लक्षात घेऊन आझाद मैदान परिसरात आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळ पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त उभारला आहे. या ऐतिहासिक मोर्चामुळे मुंबईत मराठा समाजाच्या ताकदीचे भव्य दर्शन घडत आहे. मराठा बांधवांमधील उत्साह, आक्रमकता आणि निर्धार यामुळे वातावरण तापले आहे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तगडा बंदोबस्त उभारला आहे. मात्र, आंदोलकांचा जोश पाहता ही लढाई किती तीव्र होणार आहे, याची चाहूल लागते आहे.

मनोज जरांगे यांच्या या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे, तसेच राज्य सरकारचे डोळे लागले आहेत. कारण जरांगे यांचे उपोषण दीर्घकाळ चालले तर सरकारसमोर प्रचंड दबाव निर्माण होणार आहे. मराठा समाजाच्या या ऐतिहासिक शक्तिप्रदर्शनामुळे मुंबईतून थेट मनसे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस अशा सर्व पक्षांना मोठा राजकीय संदेश गेला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img