19 C
New York

Manoj Jarange : आंदोलन फक्त आझाद मैदानात नाही; जरांगेंनी संपूर्ण रणनीतीच सांगितली

Published:

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा मोर्चा आज शिवनेरी येथे पोहोचला आहे. शिवनेरी गडावर जाऊन महाराजांना वंदन करुन मराठा मोर्चा मुंबईकडे कूच करणार आहे. मुंबई पोलीसांनी मनोज जरांगे यांना 29 ऑगस्ट रोजी एक दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. त्यासोबतच 20 नियमांच्या अटींच्या आधीन राहून त्यांना आंदोलन करायचे आहे. मात्र मनोज जरांगे हे एक दिवसाची अट सरकारने रद्द करावी आणि कायम आंदोलन करण्याची परवानगी द्यावी यासाठी आडून बसले आहेत. आझाद मैदानासोबतच महाराष्ट्रातील गावागावत आणि तालुक्याच्या ठिकाणी आंदोलनाचीही त्यांनी रणनीती आखली आहे, याची माहिती त्यांनी शिवनेरीच्या पायथ्याशी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Manoj Jarnage मनोज जरांगे यांचा फडणवीसांना इशारा

मनोज जरांगे म्हणाले की, मी समाजासाठी गोळ्या झेलायला तयार आहे. सरकार मराठाविरोधी आणि हिंदूविरोधी कारवाया करत आहे. मी आझाद मैदानात उपोषण आंदोलन करणार आहे. आज माझ्यासोबत आलेले सर्व आंदोलक हे मला आझाद मैदानात सोडून परत आपापल्या गावी जाणार आहेत. त्यांना सगळ्यांना आझाद मैदानापर्यंत येऊ द्यावे, ही सरकारकडे विनंती आहे. दुसरी विनंती आहे की, आरक्षण देऊन मराठ्यांचे मन जिंकण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आली आहे. मराठी समाज हा इमानदार आहे, देणाऱ्याचे उपकार कधी विसरत नाही, मात्र अपमान करणाऱ्यांना कधी सोडत नाही, हे देखील फडणवीसांनी लक्षात ठेवावे, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला आहे. गरीब मराठ्यांच्या हक्काचे ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, असेही ते म्हणाले.

Manoj Jarnage आझाद मैदानात आंदोलन कायम होणार!

29 ऑगस्टला सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंतच आंदोलनाची परवानगी मनोज जरांगे यांना मिळाली आहे. एका दिवसाची परवानगी आम्हाला मान्य नाही. आंदोलन कायम होणार. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार. सरकारची ही अट आम्हाला मान्य नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, पाच हजारांपेक्षा जास्त लोक मैदानात नको तर ती अट आम्हाला मान्य आहे. लोक येत जात राहतील, मात्र आंदोलन कायम होणार, असे मनोज जरांगेंनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, मुंबईत आझाद मैदानात माझे उपोषण चालू राहील. माझ्यासोबत आलेले लोक हे परत त्यांच्या-त्यांच्या गावी जातील. गावात, तालुक्यात त्यांनी आंदोलन करायचे आहे. त्यासाठीचे आमचे नियोजन पूर्ण झाले आहे.

Manoj Jarnage मराठा समाजाला मनोज जरांगे यांचे आवाहन, काय म्हणाले…

मनोज जरांगे यांचे प्रथमच मुंबईत आंदोलन होत आहे. याआधी त्यांचा मोर्चा वाशीमध्ये अडवण्यात आला होता. वाशीमध्येच त्यांना थांबवण्यात आले आणि तिथेच आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मात्र मुंबईतील आझाद मैदान येथे ऐन गणपती उत्सवकाळात आंदोलन होणार आहे. त्यामुळे आंदोलनात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आंदोलकांवर देखील आहे.
त्यामुळे मराठा समाजाला उद्देशून मनोज जरांगे म्हणाले की, “सोबत आलेल्या मराठ्यांना विशेष करुन सांगतो की, संयम ठेवायचा. शांततेत आंदोलन करायचे. पोलिसांनी जे नियम घालून दिलेले असतील त्यांचे काटेकोर पालन करायचे. आंदोलन स्थळापासून एक किलोमीटर अलीकडे थांबण्याची वेळ आली तरी थांबायचे. गडबड गोंधळ करायचा नाही.” असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img