19 C
New York

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर दाखल! पुण्यात वाहतूक व्यवस्था बदलली

Published:

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून या मागणीसाठी मुंबईकडे (Maratha reservation) रवाना झाले. आता ते शिवनेरी येथे दाखल झाले असून रात्री दोन वाजता पारनेरमध्येही त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे (Mumbai Morcha) आरक्षणासाठी हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत ठाम आहेत.

Manoj Jarange Patil आझाद मैदानात आंदोलन

मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी फक्त एक दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आझाद मैदानात आंदोलन करतील, असे मुंबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. मैदानाची क्षमता 7 हजार चौ.मी. असून, त्यानुसार फक्त 5000 आंदोलकांना प्रवेश देण्यात येणार आहे.

Manoj Jarange Patil वाहतूक व्यवस्थेत बदल

मराठा मोर्चामुळे पुणे जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नाग-कल्याण मार्गावरील वाहतूक 14 नंबर जांबुत फाटा येथून बोर-बेल्हे-अळकुटी-पारनेर-अहिल्यानगर मार्गे, तर नारायणगावकडून जुन्नरकडे जाणारी वाहतूक ओझर फाटा-कारखाना फाटा-शिरोली बुद्रुक मार्गे वळविली जाणार असल्याचे आदेश दिले आहेत.

Manoj Jarange Patil मनोज जरांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या

– मराठा आणि कुणबी एकच आहेत, याची अंमलबजावणी केली पाहिजे; अन्यथा मुंबई सोडणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
– हैदराबाद गझेटियर लागू करावे; सातारा व बाँबे गझेटियर देखील लागू करावेत, असे त्यांनी सांगितले.
– सगे सोयरेचा अध्यादेश लागू करावा; मराठा समाज संयमी असून, ज्याची कुणबी नोंद आहे त्याचे सगे सोयरे पोट जाऊनही द्यावेत, असे मनोज जरांगे म्हणाले.
– गुन्हे मागे घ्या; आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांची स्थिती सुधारावी, असे आवाहन त्यांनी केले.
– कायद्यात बसणारे आरक्षण द्यावे, असे मनोज जरांगे ठामपणे सांगत आहेत.

मनोज जरांगे पाटीलच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईत मोठा मोर्चा सुरु असून, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img