19 C
New York

Manoj Jarange : फडणवीस साहेब एक दिवसाची अट मान्य नाही, जरांगेंचा शिवनेरीवरुन इशारा

Published:

समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्या, आणि गोरगरीब मराठ्यांना न्याय द्यावा, त्यांनी जर आज सरसकट आरक्षणाची अंमलबजावणी केली तर आम्ही शिवनेरीवरुनच गुलाल उधळू आणि मागे जाऊ. मात्र मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही मुंबईत येणारच आणि आझाद मैदानात आंदोलन करणार, असा निर्धार मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी शिवनेरीच्या पायथ्याशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. आज रात्रीपर्यंत मुंबईत पोहोचणार आणि 29 ऑगस्टला आझाद मैदानात पोहोचून उपोषण करणार असे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला आदरपूर्वक सांगतो की आम्हाला अट घालू नका. कारण हे लोक मला सोडायला आले आहेत. ज्यांची इच्छा असेल त्यांना येऊ द्यावे. कारण मला मुंबईत सोडल्यानंतर ते गावात, तालुक्यात जाऊन आंदोलन करणार आहेत. आम्ही आमच्या आंदोलनाचे टप्पे केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अटीशर्ती काढून टाकाव्यात, अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली आहे.

Manoj Jarange पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

– देवेंद्र फडणवीस साहेब कोणाला थांबवणार नाहीत. गोरगरीबांचा सन्मान करतील. एक दिवसाची परवानगी देणे ही गोरगरीब मराठ्यांची चेष्ठा आहे.
त्यांना असे सिद्ध करायचे होते की, मी परवानगी दिली माझी काय चूक आहे. तुम्ही न्यायालय न्यायालय म्हणत होते, पण परवानगी देण्याचा अधिकार तुमच्याकडेच होता. तुम्ही मोठं मन दाखवून गोरगरीबांच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे. पूर्ण वेळ तुम्ही दिला पाहिजे होता.
– फोन कशासाठी केला होता. रात्री 12 वाजता ते भेटायला निघाले होते. आता जर म्हणत असतील की आम्ही चर्चेला तयार नाही. मी चर्चेला तयार नाही,
– शिष्टमंडळ भेटायला आले तर चर्चेला तयार आहे. राजकीय नेते भेटायला तयार नाहीत. गोरगरीब मराठ्यांची नाराजी घ्यायला राजकीय नेते तयार नाहीत.
– शिवनेरी गडाच्या पायऱ्यावरुन सांगतो संधीचं सोनं करण्याची तुम्हाला योग्य संधी आहे.तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे उपकार गोरगरीब मराठे विसरणार नाहीत. तुम्ही तुमची मराठा विरोधी आडमुठी भूमिका सोडून द्या. तुम्ही काही आमचे शत्रू नाही, तुम्हाला संधी आली आहे. त्याचं सोनं करा. आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची भूमिका तुम्ही बदला.
– राजकीय करिअर उद्ध्वस्त होईल, सत्तेशिवाय प्रश्न सुटत नाही, हे आम्हाला सत्ताधाऱ्यांनी शिकवलं आहे.
– एक दिवसाची परवानगी दिली आहे तर एका दिवसातच अंमलबजावणी करा. नाही तर आताच मागणी मान्य करा. आम्ही शिवनेरीवरुनच गुलाल उधळणार. आता मागे हटणार नाही.
– कायद्याचे जेवढे नियम आहे ते आम्ही पाळणार. पण 2025 मध्ये जो कायदा केला आहे तो कोणालाच कळत नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img