16.2 C
New York

Heavy Rain : बाहेर पडताना काळजी घ्या! मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट; घाटमाथ्यांवर ऑरेन्ज

Published:

पावसाची (Heavy Rain) राज्यात आज पुन्हा ताकद वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागात हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Indian Meteorological Department) आज पावसाच्या सरी बरसण्याची (Maharashtra Rain) अपेक्षा आहे.

Heavy Rain मध्य महाराष्ट्रात ऑरेन्ज अलर्ट

मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यास ऑरेन्ज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी या भागात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Heavy Rain कोकणासाठी यलो अलर्ट

मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकणसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.

Heavy Rain विदर्भ, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस

पुणे, आहिल्यानगर, नाशिक, जळगावसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. हलका ते मध्यम पाऊस या भागात पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी 30-40 किमी/तास वेगाने वारे विजांच्या कडकडाटासह वाहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, वारे अन् विजांचा कडकडाट होऊ शकतो. या भागातील नागरिकांनी पावसाच्या तयारीसाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img