बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सुझान खान (Sussanne Khan) यांच्या घटस्फोटाला आता अनेक वर्षं लोटली असली तरी चाहत्यांमध्ये या दोघांच्या नात्याबाबत नेहमीच कुतूहल असतं. वेगळं झाल्यानंतरही दोघं मुलं रिहान आणि रिदान यांच्या संगोपनात एकत्र दिसतात. दरम्यान, सुझानचा भाऊ आणि अभिनेता जायेद खान (Javed Khan) याने बहिणीच्या खासगी आयुष्याबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आलं आहे.
जायेद म्हणाला की, “मी हृतिकला तब्बल 12 व्या वर्षापासून ओळखतो. तेव्हा त्याचं आणि सुझानचं रिलेशन सुरू झालं नव्हतं. माझं कुटुंब नेहमी प्रेमाच्या बाजूने उभं राहिलं आहे. सुझानने जी निवड केली ती योग्य आहे आणि आम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो.”
त्याने पुढे सांगितलं, “ती स्वतःच्या निर्णयाची मालक आहे. तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली आहे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक भावासारखंच मला तिचं सुख महत्वाचं आहे.”
हृतिक आणि जायेद यांचं सध्या कोणतंही नातं नाही. मात्र जुन्या आठवणी सांगताना जायेद म्हणाला की, एकदा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये त्याने शाहरुख खानची निवड केली होती. त्यावेळी तो शाहरुखसोबत काम करत होता, पण घरी परतल्यावर सुझानने त्याच्याकडे नाराज नजरेने पाहिलं होतं. तरीदेखील हृतिकने कधीही हे मनावर घेतलं नाही.
हृतिक आणि सुझान यांची प्रेमकहाणी कॉलेजपासून सुरू झाली होती. दोघांनी 20 डिसेंबर 2000 रोजी बंगळुरूमध्ये लग्न केलं. त्यांना दोन मुलं झाली – रिहान (2006) आणि रिदान (2008). मात्र, डिसेंबर 2013 मध्ये ते वेगळे झाले आणि नोव्हेंबर 2014 मध्ये अधिकृतरीत्या घटस्फोट झाला.