गेल्या आठवड्यात राज्यात (Maharashtra Rain) झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान नोंदवले (Rain Alert) गेले. काही दिवस विश्रांती मिळाल्यानंतर हवामान विभागाने मुसळधार पावसाचा (Rain Update)इशारा दिला आहे. महाराष्ट्रात पावसाची तीव्रता बंगालच्या उपसागरात तसेच मध्यप्रदेशात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे (Heavy Rain) वाढली आहे. यामुळे राज्यातील काही भागांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Rain मराठवाडा विभागासाठी ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, कोकण आणि मराठवाडा विभागासाठी आज ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली आणि घाटमाथा भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जाहीर आहे. मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. वाऱ्यासह बरसणाऱ्या सरींमुळे रस्त्यांवर पाणी साचले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांचीही सकाळी चांगलीच तारांबळ उडाली.
Maharashtra Rain पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता
गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता राज्यभर दिसत असतानाच पावसाचा जोर वाढल्याने नागरिक चिंतेत आहेत. हवामान खात्याने 25 ऑगस्टपर्यंत मुंबई आणि उपनगरांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याआधी आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मुंबईच्या लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला होता. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे प्रशासनाने यावेळी सज्जता ठेवत उपाययोजना सुरू केल्या आहेत.