21.7 C
New York

Mohammed siraj : आरसीबीने का सोडला सिराज सारखा बॉलर बोबाट यांनी दिलं स्पष्ट उत्तर

Published:

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाआधी सर्व संघांनी आपल्या टीममध्ये फेरबदल केले. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (आरसीबी) (RCB) मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) रिलीज करण्याचा निर्णय सर्वात जास्त चर्चेत राहिला. सात वर्षं संघात असलेल्या सिराजला सोडल्यानंतर त्याला गुजरात टायटन्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. पण आरसीबीने असं का केलं याचं कारण अधिकृतपणे समोर आलं नव्हतं.

अखेर आरसीबीचे क्रिकेट डायरेक्टर मो बोबाट (Bobbat) यांनी या निर्णयामागचं खरं कारण स्पष्ट केलं. त्यांच्या मते, आरसीबीचा उद्देश भक्कम आणि समतोल गोलंदाजी आघाडी तयार करण्याचा होता. त्यामुळे अनुभवी स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) संघात आणणं प्राधान्याचं होतं. बोबाट यांनी मान्य केलं की, सिराजला (Siraj) रिटेन केलं असतं तर भुवनेश्वरला घेणं अवघड झालं असतं, कारण बजेट आणि प्राथमिकतेचा समतोल साधणं आवश्यक होतं.

बोबाट यांनी सांगितलं, “सिराज हा असा खेळाडू होता ज्याच्याबाबत आम्ही सर्वाधिक विचार केला. भारतीय आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोलंदाज सहज मिळत नाही. रिटेन किंवा राईट टू मॅच सर्व पर्यायांवर चर्चा झाली. पण शेवटी भुवनेश्वरच्या अनुभवाला प्राधान्य दिलं.”

याचबरोबर त्यांनी आणखी एक महत्वाचा खुलासा केला. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन (Camren Green) जखमी असल्याने त्याला रिटेन करण्यात आलं नाही. “जर तो फिट असता तर त्याला आम्ही नक्कीच कायम ठेवला असता,” असंही बोबाट म्हणाले.

सध्या मोहम्मद सिराज जोरदार फॉर्मात आहे. इंग्लंड (England) दौऱ्यात त्याने भेदक गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. मात्र, आशिया कपसाठी (Asia Cup) त्याला निवड मिळाली नाही यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. आता सिराज थेट वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img