पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि जागतिक क्रिकेट स्टार इमरान खान (Imran Khan) यांचं बॉलिवूडसोबतचं नातं अनेकदा चर्चेत आलं आहे. क्रिकेट मैदानावर त्यांच्या लोकप्रियतेइतकीच त्यांची चर्चा बॉलिवूडमध्येही व्हायची. देव आनंद यांनी एकदा तर इमरान खान यांना हिंदी सिनेमात प्रवेश देण्याची ऑफर दिल्याचंही म्हटलं जातं.
इमरान खान यांच्या व्यक्तिमत्त्वावर अनेक अभिनेत्री फिदा होत्या. त्यामध्ये एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा (Rekha) यांचं नाव सर्वांत गाजलं. 1985 मध्ये इमरान खान बराच काळ मुंबईत थांबले होते आणि त्या काळात रेखासोबत त्यांच्या जवळीकतेच्या बातम्या गाजल्या. दोघांना नाईट क्लबमध्ये एकत्र पाहिलं गेलं. इतकंच नव्हे तर, रेखा यांच्या आईनेही या नात्यावर प्रतिक्रिया देत, “माझ्या मुलीसाठी इमरानसारखा जोडीदार कोणीच नाही” असं म्हटलं होतं. पण नातं लग्नापर्यंत न पोहोचता थांबलं.
यामागचं कारण म्हणजे इमरान खान यांचं स्वतःचं वक्तव्य. एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं होतं की, “मला अभिनेत्रींसोबत वेळ घालवायला आवडतं, त्यांच्यासोबत मी काही काळ एन्जॉय करतो… पण लग्नासाठी मी अभिनेत्रीला कधीच पसंत करणार नाही.” या विधानानंतर रेखा आणि इमरान यांचं समीकरण संपलं.
फक्त रेखाच नाही तर अभिनेत्री झिनत अमान (Zeenat Aman) यांच्यासोबतही त्यांचं नाव जोडण्यात आलं. 1979 मध्ये झिनत अमान त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये उपस्थित होत्या आणि तेव्हापासून या चर्चेला उधाण आलं. मात्र, दोघांनी कधीही आपल्या नात्याबद्दल खुलं बोलणं पसंत केलं नाही.