21.7 C
New York

Karishma Kapoor : ९० च्या दशकात शूटिंग करताना करिष्माने सांगितला तो किस्सा!

Published:

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) गेली तीन दशके चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. मात्र तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आजच्या काळात कलाकारांसाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत, पण 90 च्या दशकात परिस्थिती वेगळीच होती. त्या काळात कलाकारांकडे आराम करण्यासाठी खोली नव्हती, कपडे बदलण्यासाठी जागा नव्हती आणि शुटिंगदरम्यान स्वच्छ बाथरुमचीही सोय नव्हती. करिश्मा आठवणीत सांगते की, कधी कधी कपडे झुडपांच्या मागे बदलावे लागत आणि टॉयलेटसाठी दूरवर चालत जावे लागत असे.

करिश्माने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने सांगितले की, त्या काळात कलाकारांना स्वतःचं बघून घ्यावं लागे. अनेकदा रस्त्याकडेला असलेल्या दुकानात थांबून किंवा जवळच्या घरांमध्ये परवानगी मागून कपडे बदलावे लागत. आता इंडस्ट्रीत झालेल्या बदलांकडे पाहून विश्वासही बसत नाही, असं करिश्मा म्हणते.

याशिवाय तिने चित्रपट निर्मितीच्या पद्धतीबद्दल सांगितले की, पूर्वी कलाकारांना स्वतःचं काम पडद्यावर येईपर्यंत पाहता येत नसे. आम्ही फक्त डबिंग करायचो आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच प्रत्यक्ष परिणाम दिसायचा, असं ती म्हणाली.

सध्या करिश्मा बॉलिवूडपासून थोडी दूर आहे, पण सोशल मीडियावर मात्र ती कायम सक्रिय असते. स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. वैयक्तिक आयुष्यामुळेही करिश्मा अनेकदा चर्चेत राहिली आहे. तिचं लग्न उद्योजक संजय कपूरसोबत झालं होतं, मात्र काही वर्षांतच नातं तुटलं. नुकताच संजय कपूर यांचं निधन झालं असून, आज करिश्मा दोन मुलांची जबाबदारी सिंगल मदर म्हणून सांभाळते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img