19.7 C
New York

Ghabadkund : भव्य सेटवर उलगडणार ‘घबाडकुंड’चे रहस्य मराठी चित्रपटसृष्टीला मिळणार थ्रिलर ट्रीट!

Published:

प्रत्येकालाच आयुष्यात अचानक श्रीमंती मिळावी, एखादं घबाड हाती लागावं आणि नशीब एका क्षणात पालटावं असं वाटतं. हाच रोमांचक प्रवास ‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटात रंगणार आहे. ‘घबाड’ म्हणजे अचानक धनप्राप्ती, तर ‘कुंड’ म्हणजे खोलगट जागा किंवा विहीर या दोन संकल्पनांचा संगम म्हणजेच ‘घबाडकुंड’ (Ghabadkund) हे आकर्षक शीर्षक.

‘अल्याड पल्याड’च्या यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील, निर्माते रसिक कदम आणि सहनिर्मात्या स्मिता पायगुडे-अंजुटे यांची तिकडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी रहस्य, अॅक्शन, थरार आणि विनोदाची मेजवानी घेऊन येत आहे.

या चित्रपटासाठी पुण्याजवळील खेड-शिवापूर येथे तब्बल 10 ते 12 हजार स्क्वेअर फुटांवर भव्य सेट उभारण्यात आला आहे. पाण्याची कुंड, गूढ विहिरी, गुहा, प्राचीन मंदिरे आणि रहस्यमय मार्ग या सगळ्यांच्या साथीने थरारक दृश्ये रंगवली जाणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत अशा दर्जेदार आणि खर्चिक सेटचा हा पहिलाच अनुभव असणार आहे.

कलाकारांची फौजही तितकीच दिमाखदार आहे. देवदत्त नागे (Devdutt Nage), कुशल बद्रिके (Kushal Badrike), संदीप पाठक (Sandeep Pathak), शशांक शेंडे (Shashank Shende), प्राजक्ता हनमघर (Prajakta Hanamghar), स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, साहिल अनलदेवर यांसारखे लोकप्रिय चेहरे यात दिसणार आहेत. ‘घबाडकुंड’मध्ये केवळ थरारच नाही, तर नात्यांची गुंतागुंत, अविश्वास, संशय आणि त्यातून निर्माण होणारी तणावपूर्ण परिस्थिती प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.

या चित्रपटाचे लेखन संजय नवगिरे व अक्षय धरमपाल यांनी केले असून, कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी, संपादन सौमित्र धाराशिवकर यांचे आहे. अॅक्शन सिक्वेन्ससाठी साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांची साथ आहे.

विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलगू या तीन भाषांमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असून, मराठी सिनेमात मोठ्या बजेटचा थरारक अनुभव घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img