19.7 C
New York

Gautami Patil : लावणीची राणी गौतमी पाटील एका शोमागे लाखोंची कमाई!

Published:

महाराष्ट्रात लावणी म्हटलं की सर्वात आधी आठवण येते ती गौतमी पाटीलची (Gautami Patil). तिच्या नावाभोवतीच एक वेगळं स्टारडम तयार झालं आहे. लाखो चाहते तिच्या प्रत्येक परफॉर्मन्सची आतुरतेने वाट पाहतात आणि तिचे कार्यक्रम म्हणजे हमखास हाऊसफुल्ल शो!

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये तिची लोकप्रियता अफाट आहे. साध्या परिस्थितीतून पुढे आलेली गौतमी आज स्वतःच्या मेहनतीमुळे इतकी मोठी स्टार बनली आहे. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न नेहमी फिरत असतो. गौतमी पाटील एका शोसाठी किती मानधन घेते?

मिळालेल्या माहितीनुसार, गौतमी पाटीलला एका शोसाठी तब्बल ३ ते ५ लाख रुपये मानधन दिलं जातं. तिच्या संपूर्ण टीमचा महिन्याचा हिशोब केला तर ही रक्कम थेट ४५ ते ५० लाखांपर्यंत पोहोचते.

याचबरोबर गौतमी आता फक्त लावणीवरच नाही तर मालिकांमध्ये पाहुणी कलाकार म्हणून आणि चित्रपटांमध्येही झळकली आहे. त्यामुळे तिच्या मानधनात आणखी वाढ झाल्याचं बोललं जात आहे.

स्थानिक सांस्कृतिक मंडळे, उत्सव समित्या किंवा खासगी कार्यक्रम – कुठेही गौतमीला बोलवायचं असेल तर आयोजकांना मोठा खर्च करावा लागतो. म्हणूनच आज ती महाराष्ट्रातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये गणली जाते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img