पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटण्याच्या मार्गावर आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेत 29 ऑगस्ट रोजी मुंबईत (Mumbai) भव्य आंदोलन उभारण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे आज दुपारी 12 वाजता आंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेणार असून त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण (Manoj Jarange Patil Press Conference) राज्याचं लक्ष लागलं आहे.
काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आंदोलनाचा बिगुल वाजवला. ही शेवटची लढाई आहे. शांततेत आंदोलन करायचं आहे. कुणी दगडफेक-जाळपोळ करू नये. आपल्याला मुंबईला जायची हौस नाही, पण लेकरंबाळांच्या भविष्यासाठी जावं लागतंय. 27 ऑगस्टला सकाळी दहा वाजता आंतरवलीतून मुंबईकडे प्रस्थान करायचं, असं आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले.
Manoj Jarange Patil गावोगाव बैठकांद्वारे जनजागरण
या आंदोलनासाठी जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून गावोगाव सभा, गाठीभेटी घेत आहेत. समाजबांधवांना मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होण्याचं आवाहन ते सातत्याने करत आहेत. त्यामुळे मुंबईत 29 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाचा व्यापक परिणाम जाणवण्याची चिन्हं आहेत.
Manoj Jarange Patil 25 हजार गाड्यांचा ताफा मुंबईकडे
सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. 25 हजार गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना होणार असून हजारो नागरिक आंदोलनात सहभागी होणार आहेत. या बैठकीत ‘समाजासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या नेत्यांनाच पाठिंबा दिला जाईल’ असा निर्धार करण्यात आला.
Manoj Jarange Patil राजकीय आरोप-प्रत्यारोप
याच बैठकीत राज्य मराठा समन्वयक माऊली पवार यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर टीकास्त्र सोडलं. सरकारने मराठा आंदोलनात गोंधळ निर्माण करण्यासाठी हाके यांना फॉर्च्युनर गाडी व फ्लॅट दिला, असा थेट आरोप त्यांनी केला. तसेच, जरांगे पाटील यांनी कोट्यवधी मराठ्यांची मने जिंकली आहेत. लाखोंच्या गर्दीत मिळालेला पाठिंबा हीच खरी ताकद आहे. त्यामुळे काही लाखांच्या चर्चेचा काही उपयोग नाही, असंही पवार म्हणाले.
हाके यांनी जरांगे पाटील यांना कोणत्या आमदारांनी 10 लाख रुपये दिले हे उघड करावं, अशी मागणी देखील बैठकीतून करण्यात आली. धनगर समाजाशीही ते प्रामाणिक नाहीत, मग मराठा समाजावर बोलण्याचा अधिकार त्यांना नाही, अशी टीका पवार यांनी केली.
Manoj Jarange Patil राज्याचं लक्ष मुंबईतील आंदोलनाकडे
जरांगे पाटील यांची आजची पत्रकार परिषद ही निर्णायक ठरणार आहे. ते सरकारला पुन्हा वेळ देणार का की थेट संघर्षाची हाक देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या आंदोलनामुळे राज्य सरकारची डोकेदुखी निश्चितपणे वाढणार आहे.