सलमान खानच्या (Salman Khan) लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’चा आज (24 ऑगस्ट) जल्लोषात शुभारंभ झाला आहे. प्रत्येकवेळी प्रेक्षकांना शंभर दिवसांच्या प्रवासानंतर विजेत्याचं दर्शन घडतं, मात्र यंदा निर्मात्यांनी मोठा ट्विस्ट ठेवला आहे. प्रीमिअरच्या पहिल्याच भागात प्रेक्षकांना ‘पहिला विजेता’ मिळणार आहे.
शोच्या घरात प्रवेशासाठी यंदा दोन स्पर्धकांमध्ये थेट ऑडियन्स वोटिंग घेण्यात आलं. युट्यूबर मृदुल तिवारी आणि अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाज बादशाह या दोघांमध्ये प्रेक्षकांनी पसंती दिली. सलमान खानच्या घोषणेनुसार, शहबाजला मागे टाकत मृदुल तिवारीला बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून संधी मिळाली आहे. त्यामुळे शोच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांना पहिला ‘विजेता’ पाहायला मिळाला.
तथापि, बिग बॉस 19 (Bigg Boss) चं खरं विजेतेपद मिळवण्यासाठी पाच महिन्यांचा कठीण प्रवास करावा लागणार आहे. यंदा हा शो नेहमीपेक्षा जास्त म्हणजे पूर्ण पाच महिने चालणार आहे. मात्र सूत्रसंचालनासाठी सलमान खान फक्त तीन महिन्यांपर्यंतच दिसणार असून, त्यानंतर ही जबाबदारी दुसऱ्या सेलिब्रिटीकडे सोपवली जाणार आहे.
या सिझनमध्ये गौरव खन्ना, अमाल मलिक, आवेज दरबार, तान्या मित्तल, कुनिका सदानंद, नीलम गिरी, अशनूर कौर अशा अनेक कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्स सहभागी होणार आहेत. यामुळे ‘बिग बॉस 19’ हा सिझन प्रेक्षकांसाठी रोमांचक ट्विस्ट, नवी नाट्यमयता आणि जबरदस्त स्पर्धा घेऊन आलाय.