21.5 C
New York

Cheteshwar Pujara : टीम इंडियाची भिंत कोसळली, चेतेश्वर पुजाराची क्रिकेटमधून निवृत्ती

Published:

क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा (Team India) कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. चेतेश्वर पुजाराची कारकिर्द जवळपास वीस वर्षांची होती. या वीस वर्षांत पुजाराने 13 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये व्यतीत केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सन 2005 मध्ये पुजाराने पहिला सामना खेळला होता. हा सामना सौराष्ट्र आणि विदर्भ यांच्यात होता. पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अखेरचा सामना फेब्रुवारी 2025 गुजरात विरुद्ध खेळला होता.

सन 2010 मध्ये पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बंगळुरूत ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. हा सामना कसोटीतील होता. यानंतर सन 2013 मध्ये बुलावायो येथे झिम्बाम्बे विरुद्धच्या सामन्यातून पुजाराने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पुजाराला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जास्त संधी मिळाली नाही. परंतु, त्याचं नशीब कसोटीतच चमकलं.

Cheteshwar Pujara पुजाराच्या बाबतीत खास योगायोग

मागील 13 वर्षांपासून पुजारा कसोटीत भारतीय संघाचा हुकूमी एक्का होता. सलामीलाच येऊन तो अगदी चिवट फलंदाी करायचा. संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात पुजाराचे नेहमीच योगदान असायचे. पुजाराने त्याचा अखेरचा कसोटी सामना देखील जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच खेळला होता. हा पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीतील खास योगायोगच म्हणावा लागेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img