टॅरिफच्या मुद्द्यावर भारत आणि अमेरिकेत तणाव (India Us Tariff War) कायम आहे. या तणावातच भारतीय पोस्ट खात्याने एक (Indian Post) महत्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत नवीन नियम लागू झाल्यानंतर पोस्टाने अमेरिकेत जाणाऱ्या बहुतांश पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने भारतावर टॅरिफ आकारल्यानंतर नियमांतही मोठे बदल होत आहेत. या नियमांचा विचार करून पोस्ट खात्याने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 25 ऑगस्टपासून अमेरिकेसाठीच्य बहुतांश पोस्ट सेवा बंद करण्यात येणार आहेत.
ट्रम्प सरकारने 30 जून रोजी जारी केलेल्या एका आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार 800 अमेरिकी डॉलरपर्यंतच्या आयात होणाऱ्या वस्तुंवर टॅरिफची सूट रद्द करण्यात आली आहे. 29 ऑगस्टपासून अमेरिकेत येणाऱ्या वस्तू इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमी पॉवर अॅक्ट (IEEPA) टॅरिफ अंतर्गत सीमा शुल्क आकारले जात आहे. 100 अमेरिकी डॉलर्सपर्यंच्या वस्तूंवर मात्र टॅरिफ सवलत राहणार आहे.
अमेरिकेतील आदेशानुसार इंटरनॅशनल पोस्ट नेटवर्कच्या माध्यमातून माल पोहोचवणाऱ्या एअरलाइन्स किंवा अमेरिकी सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा (CBP) विभागाकडून प्रमाणित अन्य पार्टीलाही टॅरिफ वसूल करणे आणि त्याचे पेमेंट करणे आवश्यक आहे. या संदर्भात CBP ने 15 ऑगस्ट रोजी काही सूचना दिल्या होत्या. परंतु, टॅक्स कलेक्शन, पार्सल पाठवण्याची व्यवस्था यांसारख्या गोष्टी अजून निश्चित झालेल्या नाहीत.
India Us Tariff War भारताने का केली पोस्ट सर्व्हिस
अमेरिकेला जाणाऱ्या एअरलाइन्सने संचालन आणि तांत्रिक तयारीच्या कमतरतेचा हवाला देत 25 ऑगस्टपासून पोस्ट पार्सल स्वीकारण्यास नकार दिला आहे. या गोष्टींचा विचार करून पोस्टाने 25 ऑगस्टपासून अमेरिकेला पोस्ट सेवेच्या माध्यमातून जाणाऱ्या सर्व वस्तू आणि बुकिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 100 अमेरिकी डॉलर्स किंमतीपर्यंतच्या वस्तू मात्र पाठवता येतील.
पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार सीबीपी आणि यूएसपीसकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर या सवलत असलेल्या वस्तू्ंना अमेरिकेत पाठवणे सुरू राहील. पोस्टाकडूनही या संबंधीच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ज्या ग्राहकांनी आधीच बुकिंग करून ठेवली होती परंतु आता पार्सल पाठवणे शक्य होणार नाही. त्यामुळे या ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळण्यासाठी क्लेम करता येणार आहे.