राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यात चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. माझ्या पांडुरंगाला (Pandurang) मी मटण खाल्लेलं चालतं, मग तुम्हाला काय (Non Veg) समस्या आहे? असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं. त्यानंतर भाजपकडून (BJP) त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे.
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी (BJP Adhyatmik Aghadi Tushar Bhosale) सुळे BJP) यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, कोणी काय खावे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. मात्र, वारकरी परंपरेत पिढ्यानपिढ्या शाकाहार पाळला जातो. वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाबाबत अशा प्रकारे बोलणे म्हणजे अज्ञानाचे लक्षण आहे. वारकरी परंपरेचा सन्मान नाही केला, तरी किमान अपमान करू नये. पण शरद पवारांच्या मुलीकडून असेच बोलणे अपेक्षित होते.
दरम्यान, माध्यमांनी या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनीही सुळे यांच्यावर थेट भाष्य टाळले. मात्र त्यांनी असे नमूद केले की, याबाबत उत्तर मी देणार नाही, याचे उत्तर महाराष्ट्रातील सर्व वारकरी देतील.
Supriya Sule सुप्रिया सुळे यांचे काय वक्तव्य?
शनिवारी दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी मांसाहाराबाबत प्रश्न उपस्थित करत स्पष्ट शब्दांत म्हटले की, आम्ही आमच्या पैशांनी मटण खातो, त्यात कोणाचे काही जाणार नाही. आम्ही कोणाचे गुलाम नाही. मी मटण खातो तर काय पाप केले आहे का? माझ्या पांडुरंगाला ते मान्य आहे, मग तुम्हाला काय अडचण आहे?
याच कार्यक्रमात त्यांनी शरद पवार यांच्या पुरोगामी विचारांचा दाखला देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. 50 वर्षांपूर्वी पवार साहेबांनी स्वतःचे ऑपरेशन केले, पण पत्नीचे नाही. हेच खरं पुरोगामित्व आहे, असे सुळे म्हणाल्या.
Supriya Sule केंद्र सरकारकडे कर्जमाफीची मागणी
या वेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याचा मुद्दाही उपस्थित केला. सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री म्हणाले होते की कर्जमाफी देऊ. पण आम्ही दहा वेळा वेळ मागूनही ते आम्हाला भेटीसाठी वेळ देत नाहीत. म्हणून आम्हाला दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यावी लागली. त्यांनी आमच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.
तसेच, मुख्यमंत्री मला वेळ देत नाहीत, त्यामुळे मी आता मागण्या करणं बंदच केलं आहे. माझी कामं आता दिल्लीतच होत आहेत. इथं काहीच होत नाही, असं सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि वारकरी पंथामध्ये तीव्र नाराजी पसरली. शरद पवार गट आता या टीकेला कसे उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.