17.9 C
New York

Devendra Fadnavis : ‘राज्यातील तीन हजार महिला सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार’, CM फडणवीसांची घोषणा

Published:

एक मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) केली आहे. राज्यातील महिला सहकारी संस्थांना यापुढे राज्य सरकारच्या माध्यमातून होणारी कामे दिली जातील अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील 36 लाख 78 हजार महिला भगिनींनी प्रदेश भाजप महिला आघाडीच्यावतीने फडणवीसांना राख्या पाठवल्या होत्या. यानिमित्त राखी प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ. मंदा म्हात्रे आदी उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले, देश समाजातील 50 टक्के असलेल्या महिलांच्या सहभागाशिवाय मजबूत होणार नाही. राज्य सरकारने महिलांसाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यातील एकही योजना बंद होणार नाही. 2029 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही महिलांचा मोठा सहभाग असेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

राज्यात तीन हजार महिला सहकारी संस्थांची स्थापना झाली आहे. या संस्थांच्या फेडरेशनचीही नोंदणी झाली आहे. आमदार चित्रा वाघ यांनी याकामी पुढाकार घेतला होता. यासंदर्भात बोलताना फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. बचतगट किंवा अन्य मार्गांनी कर्ज घेणाऱ्या महिला 100 टक्के कर्ज परत करतात. त्या तुलनेत पुरुष मात्र कर्जाची परतफेड करत नाहीत असे स्पष्ट करत महिला सहकारी संस्थांना सरकारी विविध कामे, कंत्राटे दिली जातील. लवकरच ही योजना सुरू केली जाईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या या घोषणेनंतर महिलांसाठी सरकारी पातळीवर आणखी एक योजना सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img