जामनेर (Jamner) तालुक्यातील शेंदुर्णी गावात दिनांक: २२/८/२०२५ रोजी बैल पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. बैलांना वेगवेगळ्या रंगाची सजावट व त्यांच्या अंगावर आकर्षित नावे लिहिली जाते. त्यांचे गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक घरातील आपल्या राजाचे म्हणजे बैलाची करून पुरणपोळी महिलांच्या हातून भरवण्यात आली. वर्षभर शेतात राब- राब राबणारा शेतकऱ्याच्या सोबत जीवाचं रान करणारा हा जिवलग मित्र म्हणजे बैल. आज बैलांचा सण असून शेंदुर्णी मध्ये नागरिकांनी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला.
बैलपोळा (Bailpola) या सणानिमित्त गावकऱ्यांमध्ये सामाजिक सलोखा राखण्यासाठी गावांमध्ये पोषक वातावरण निर्माण केले होते. बैलपोळ्याच्या सणाला गावातील सर्व जाती-धर्माचे लोक बैलाच्या मिरवणुकीत सोबत पोळा भरण्याच्या ठिकाणी एकत्र येऊन एकमेकांची भेट घेतात. ही परंपरा शेंदुर्णी येथे कायम चालू आहे. बैल पोळा सणाच्या निमित्ताने गावात सामाजिक सलोखा व शांतता निर्माण होण्यास मदत होते.
वर्षभर त्या बैलाकडून आपल्या शेतीची कामे करत असताना, वर्षातून एकदा श्रावण (Shravan) महिन्याच्या अमावस्येला येणाऱ्या बैलपोळ्याच्या सणाला एक दिवस बैलासाठी समर्पित केला जातो. या दिवशी बैलांकडून कोणतीही कामे केले जात नसून त्यांना चांगले प्रकारे सजवले जाते. शेंदुर्णी गावातील सर्व नागरिकांनी बैलपोळा हा सण आनंदाने व शांततेने आणि मोठ्या उत्सवाने साजरा केला.तसेच संभाजी नगर जिल्ह्यातील हळदा गावामध्ये बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. व मराठवाड्यातील गावामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.