18.3 C
New York

New Mobile Update :  अर्र..अचानक बदलली फोन कॉल अन् डायलर स्क्रिन; घाबरू नका, नवीन अपडेट ओळखा डिलीटही करा

Published:

तुमच्या मोबाइलमधील कॉल आणि डायलरची स्क्रिन काय अचानक बदलली आहे? (New Mobile Update) मी तर काहीच केलं नाही पण अचानक असं काय झालं असा विचार करून हैराण झालात. फोनमध्ये या गोष्टी अचानक कशा घडल्या? याचं उत्तर मिळत नाही. फोन हॅक झाला की काय टेन्शन आलंय.. थांबा, घाबरू नका. टेन्शन तर आजिबात घेऊ नका. आम्ही तुम्हाला या अजब कोड्याचं उत्तर देणार आहोत. फक्त काळजीपूर्वक आणि स्टेप बाय स्टेप माहिती जाणून घ्या.

गुगल फोन अॅपचे एक (Google Phone App) नवीन अपडेट खरंतर यामागे कारणीभूत आहे. हा बदल फक्त त्याच स्मार्टफोन्समध्ये झाला आहे ज्यामध्ये गुगल फोन अॅपला संबंधित युजरने डायलर अॅप म्हणून सेट केलेलं आहे. या स्मार्टफोन्समध्ये गुगलने अपडेशन केल्यानंतर लगेचच त्याचे रिफ्लेक्शन दिसायला लागले. Material 3 Expressive रिडिझाइन गुगलने फोन अॅपमध्ये लागू केले आहे. या नव्या डिझाइनला जास्तीत जास्त आधुनिक, सोपे आणि युजर फ्रेंडली बनवण्यासाठी तयार केल्याचा दावा गुगलने केला आहे.

आधी आपण गुगलच्या या नव्या अपडेटमध्ये काय खास आहे, नवीन अपडेट किती युरज फ्रेंडली आहे याची माहिती जाणून घेऊ या..

या नव्या बदलात अॅपमध्ये आता तीन टॅब आहेत. Favorites आणि Recents मिळून Home टॅब येथे तयार केले आहे. या टॅबमध्ये कॉल हिस्ट्री दिसेल वरच्या बाजूला कॅरोसेलमध्ये तुमचे फेवरेट कॉन्टॅक्ट दिसतील. यामुळे कॉन्टॅक्ट सर्च वारंवार करण्याची गरज राहणार नाही. Keypad सेक्शनही नव्या डिझाइनमध्ये दिसेल. आधी Floating Action Button च्या माध्यमातूनहा सुरू होत होता. आता मात्र वेगळा टॅब तयार करण्यात आला आहे. नंबर पॅड गोल कडा असणाऱ्या डिझाइनमध्ये दिसत आहे. यामुळे इंटरफेस आणि अधिक स्पष्ट दिसत आहे. Voicemail सेक्शनमध्ये मात्र मोठे बदल झालेले नाहीत. फक्त लिस्ट स्टाइलला नवा लूक मिळाला आहे.

गुगलने कॉन्टॅक्ट्स सेक्शनला नवीन डिझाइन दिलं आहे. आता कॉन्टॅक्ट नवीन नेविगेशन ड्रॉवरमध्ये आले आहे. अॅपमधील सर्च फिल्डच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट अॅक्सेस केले जाऊ शकतात. Contacts व्यतिरिक्त Settings, Clear Call History, Help & feedback या ड्रॉवरमध्ये ऐच्छिक स्वरूपात दिले आहेत.Incoming Call स्क्रिनलाही यांसह नवा लूक दिला आहे. आता कॉल रिसीव किंवा रिजेक्ट करण्यासाठी युजर्सना हॉरिजॉन्टल स्वाइप किंवा सिंगल टॅप ऑप्शन मिळत आहे.

New Mobile Update गुगलचं अपडेट मिनिटांत होईल छूमंतर

पण काही लोकांना गुगलने केलेला हा बदल आजिबात रुचलेला नाही. त्यामुळे वनप्लसने यावर एक तोडगाही काढला आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना एक खास आयडीया दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या फिचरला हटवण्यासाठी युजर्सना जास्त कष्ट घेण्याची गरज नाही. यु्जर्सना त्यांच्या फोनमधील कॉलिंग अॅप थोड्यावेळासाठी टॅप करावे लागेल. यानंतर एक App Info ऑप्शन फोनच्या स्क्रिनवर दिसू लागेल. या ऑप्शनला ओपन केल्यानंतर युजर्स अपडेट अनइन्स्टॉल देखील करू शकतात. इतकं केल्यानंतर गुगलचं नव फीचर फोनमधून कायमच डिलीट होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img