15.9 C
New York

Devendra Fadnavis : राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट का घेतली?, स्वत: फडणवीसांनीच सांगितलं ‘हे’ कारण

Published:

राज्याच्या राजकारणातसत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या आरएसएसच्या (Thackeray) एका बैठकीत उपस्थित राहिल्याच्या मुद्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.

राज ठाकरे यांच्या भोटवीर ते मुख्यमंत्री म्हणाले, राज ठाकरे यांनी माझी भेट घेतली. त्यांनी ट्रॅफिकच्या संदर्भात मला काही सूचना केल्या आहेत. राज ठाकरेंनी दिलेल्या सूचनांचं मी स्वागत करतो. कारण कोणी सूचना अशा प्रकारे ट्रॅफिकच्या संदर्भात करत असेल तर त्यांचं स्वागत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं आहे.

Devendra Fadnavis राज ठाकरे काय म्हणाले होते?

मी देवेंद्र फडणवीसांना एक छोटा आराखडा दिला. या बैठकीत पोलीस आयुक्त देखील होते. या आराखड्यावर ते काम करतील. अनधिकृत पार्किंगबाबत काय करता येईल, सरकारने कोणती पावलं उचलण्याची गरज आहे. उपाययोजना कोणत्या करता येतील, एक प्रेझेंटेशन याबाबत आम्ही दिले. पार्किंग आणि नो-पार्किंगबाबत फुटपाथलाही रंग असला पाहिजे, राज ठाकरेंनी असं सांगितले. तज्ज्ञ लोकांना सरकाराने बोलवाला पाहिजे. तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचं आहे. शहर बरबाद होतील, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. सगळ्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, असंही राज ठाकरेंनी सांगितलं.

Devendra Fadnavis पटोले काय म्हणाले ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भारतीय जनता पक्षाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. ही निवडणूक आणि मतदान दिल्लीत होणार आहे. मग, भाजप आतापासूनच फडणवीस यांच्यावर जबाबदारी का देत आहेत. त्यांना दिल्लीत पाठवण्याची तयारी आहे का, असा खोचक सवाल काँग्रेस नेते व माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img