16.7 C
New York

Swara Bhasker Says We All Are Bisexual : “आपण सगळेच बायसेक्शुअल आहोत” स्वरा भास्करचं वक्तव्य चर्चेत

Published:

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी नेहमीच चर्चेत राहते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

स्वराने समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh yadav) यांच्या पत्नी आणि खासदार डिंपल यादव (Dimple yadav) या आपला क्रश असल्याचं सांगितलं. यासोबतच ती म्हणाली की, “जर माणसाला त्याच्या मर्जीप्रमाणे जगण्याची संधी दिली, तर आपण सगळेच बायसेक्शुअल असतो. मुलगा-मुलगी नातं (हेटेरोसेक्शुअलिटी) ही समाजाने लादलेली कल्पना आहे.” तिच्या या वक्तव्यावर नेटकरी जोरदार प्रतिक्रिया देत असून, बायसेक्शुअल, गे आणि लेस्बियन या संकल्पनांबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

बायसेक्शुअल : ज्यांना पुरुष आणि महिला अशा दोन्ही लिंगांकडे आकर्षण वाटतं. अनुभव असणं आवश्यक नसतं.

गे : जे पुरुष केवळ पुरुषांकडेच भावनिक किंवा लैंगिक आकर्षण बाळगतात.

लेस्बियन : ज्या महिला इतर महिलांकडेच रोमँटिक किंवा लैंगिक आकर्षण ठेवतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img