16.7 C
New York

Laxman Hake : शरद पवारांमुळेच जरांगे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले! लक्ष्मण हाकेंचा घणाघात

Published:

महाराष्ट्रात आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा तापलेलं वातावरण पाहायला मिळतंय. ओबीसी समाजाने (OBC Reservation) आपला हक्क वाचवण्यासाठी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर संघर्षयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी (Laxman Hake) बीडमध्ये (Manoj Jarange Patil) झालेल्या बैठकीत याची घोषणा केली. हाके यांनी स्पष्ट केलं की, मराठा आंदोलनाला ओबीसींचं आंदोलन हे विरोध करण्यासाठी किंवा त्यावर ‘काउंटर मूव्हमेंट’ म्हणून नाही. त्यांनी ठामपणे सांगितलं की, मुंबईत जाऊन ट्रॅफिक जाम करण्याची भूमिका त्यांची नसून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात लोकशाही पद्धतीने आंदोलन उभारलं जाणार आहे. हे संविधानाच्या चौकटीतलं आमचं आंदोलन असून, व्यवस्थेला (Sharad Pawar) आव्हान देणारं नाही, असं हाके यांनी स्पष्ट केलं.

Laxman Hake जरांगे पाटलांच्या मोर्चावर टीका

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे मोर्चा वळवणार आहेत. या आंदोलनावर हाके यांनी गंभीर टीका केली. मराठा आरक्षण मिळवणं हा जरांगे यांचा खरा उद्देश नाही, तर ओबीसींचं आरक्षण संपवणं हा त्यांचा डाव आहे. पंचायत राज निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ते मुंबईला चालले आहेत, असा आरोप त्यांनी केला.हाके म्हणाले की, ओबीसी आणि मराठा यांच्यात कधीही थेट संघर्ष नव्हता. पण अलीकडच्या काळात निर्माण झालेला हा संघर्ष कृत्रिम आहे. या वादामागे मूळ शरद पवार आहेत. त्यांच्या सांगण्यावरूनच जरांगे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले गेले आहेत. यामुळे राज्यातील भाईचारा बिघडला आहे, अशी बोचरी टीका त्यांनी शरद पवारांवर केली.

Laxman Hake शरद पवारांवर थेट निशाणा

गेल्या काही दिवसांत लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर सातत्याने टीका सुरू ठेवली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून पवार जाणीवपूर्वक दिशाभूल करत आहेत, असा त्यांचा आरोप आहे. जरांगे यांच्या आंदोलनामागे पवारांचीच भूमिका आहे आणि त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण केला जात आहे, असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला.

Laxman Hake संघर्षयात्रेचं स्वरूप

संघर्षयात्रा ओबीसी समाजाचं आरक्षण टिकवण्यासाठी सुरू होणारी राज्यभर होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात बैठकांद्वारे आणि आंदोलनांद्वारे सरकारवर दबाव आणण्याची रणनीती आखली गेलीय. हाके यांनी स्पष्ट केलं की, ही लढाई न्यायासाठी आहे. ती संविधानाच्या चौकटीत राहूनच लढली जाईल, असं देखील लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img