15.9 C
New York

Rinku Singh UPT20 League 2025 : रिंकू सिंहची तुफानी कॅप्टन इनिंग्स, मेरठ मॅवरिक्सचा गोरखपूरवर शानदार विजय!

Published:

लखनऊच्या इकाना स्टेडियमवर झालेल्या UP T20 लीग 2025 च्या नवव्या सामन्यात रिंकू सिंहने (Rinku Singh) पुन्हा एकदा आपला दम दाखवला. मागील सामन्यात अपयशी ठरलेला मेरठ मॅवरिक्सचा (Meerut Mavericks) कॅप्टन रिंकू या वेळी रंगात आला आणि चौफेर फटकेबाजी करत गोरखपूर लायन्सकडून (Gorakhpur Lions) विजय हिसकावून आणला.

प्रथम फलंदाजी करताना गोरखपूर लायन्सने 20 षटकांत 9 बाद 167 धावा केल्या. ध्रुव जुरेल (38), निशांत कुशवाहा (37) आणि शिवम शर्मा (25*) यांनी चांगले प्रयत्न केले. मेरठकडून विशाल चौधरी आणि विजय कुमार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले, तर जेशान अन्सारीकडे दोन विकेट गेल्या.

168 धावांचा पाठलाग करताना मेरठने धक्कादायक सुरुवात केली आणि अवघ्या 38 धावांत चार गडी गमावले. मात्र, अशा कठीण स्थितीत कर्णधार रिंकू सिंहने हातातली जबाबदारी घेतली. त्याने साहब युवराजसोबत मिळून 65 चेंडूत नाबाद 130 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

रिंकूने फक्त 48 चेंडूत 7 चौकार व 8 षटकारांच्या जोरावर नाबाद 108 धावा ठोकल्या. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 225 इतका होता. युवराजने संयमी 22 धावा केल्या. या खेळीमुळे मेरठ मॅवरिक्सने 18.5 षटकांत 6 विकेट राखून लक्ष्य पूर्ण केले.

मेरठच्या या विजयासह त्यांचा हा तीन सामन्यांतील दुसरा यशस्वी सामना ठरला, तर गोरखपूर लायन्सला तीनपैकी फक्त एक विजयावर समाधान मानावं लागलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img