15.9 C
New York

Pravin Gaikwad : शिवराय फुले शाहू आंबेडकर यांची न्यायिक सत्ता निर्माण करणे हाच महाराष्ट्र धर्म!

Published:

माझ्यावर वैयक्तिक हल्ला झाला असता तर मी विचार केला असता. मात्र माझ्यावर केलेला हल्ला हा शिवराय फुले शाहू आंबेडकर (Ambedkar) यांच्या विचारांवर हल्ला आहे. त्यामुळे आपण त्याला काय प्रतिक्रिया देतो हा विचार मी करतोय. छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj), छत्रपती संभाजी महाराज (Chatrapati Sambhaji Maharaj) यांच्यासह फुले शाहु आणि आंबेडकर यांची न्याय सत्ता होती. ही सत्ता आणि मानवता, परिवर्तन, बुद्धाकडे जाईल असा निर्धार केला पाहिजे असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले.


संभाजी ब्रिगेडच्या पुढाकाराने “महाराष्ट्र धर्मासाठी” या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. रामकृष्ण मोरे (Ramkrushn More) प्रेक्षागृह चिंचवड (Chinchwad) येथे केले होते या वेळी गायकवाड (gaikwad) बोलत होते. या वेळी सिने अभिनेते किरण माने (kiran Mane) समाज प्रबोधनकार गणेश महाराज फरताळे मानव कांबळे, माजी सनदी अधिकारी सुरेश खोपडे,सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, आबासाहेब ढवळे आदी सह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


गायकवाड म्हणाले की छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास संभाजी ब्रिगेडने पुढे आणला स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून महाराजांचा खरा इतिहास समोर आणला. मानवतावादी राज्य घटना देण्याचे महत्वाचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले. महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतावादी भूमिका पुढे आणली. छत्रपती शिवरायांची स्वराज्य स्वातंत्र्य संकल्पना,शाहू महाराजांची बंधुता,बाबासाहेबांची न्याय ही भूमिका आणि महात्मा फुले यांची समता घटनेत उमटली आहे. म्हणून घटना बदलण्याचे षडयंत्र सुरू आहे. शिरस्थ नेतृत्वावर हल्ला केल्यास सर्व घाबरतात याच उद्देशाने माझ्यावर हल्ला केला. हिंदू जगण्याची पद्धत असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. माणसासारखे वागायला लागले की बुद्धिस्ट होतो. त्यासाठी स्वतंत्र संस्कार करायला लागत नाहीत. राजकीय टीका केल्यानंतर ती टीका मैत्रिपूर्ण भावनेने घेतली जात नाही कायदा समतावादी झाला मात्र समाजातील विषमता नष्ठ करण्यासाठी समतावादी बौद्ध धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला दोन कोटी पेक्षा अधिक उद्योजक दुबई आणि सिंगापूर सह इतर देशात गेले. १० ते १२ वर्षात देशाची आर्थिक स्थिती बेकार झाली अस्मिता टोकदार करून लोकांना त्रास दिला जातो.
महाराष्ट्र समजून घेतला पाहिजे न्याय सत्ता होती मानवता, परिवर्तन,बुद्धाकडे जाईल असा निर्धार केला पाहिजे.


या वेळी सिने अभिनेते किरण माने म्हणाले की महाराष्ट्राची अवस्था विदारक मार्गावर असताना महाराष्ट्र धर्म वाचविण्यासाठी आपण पुढाकार घेतला महापुरुषांच्या विचारांना हेच अभिवादन आहे. राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी महाराष्ट्र धर्म रुजविला छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला भक्कम केले फुले शाहू आंबेडकरांनी हे विचार वाढविले संत परंपरा त्यात अग्रेसर होती मनुवाद्यांनी महापुरुषांना छळले त्यांच्या विचारांना विरोध करण्यासाठी महाराष्ट्र धर्माची उजळणी करायला हवी शिवविचाराच्या प्रचाराला प्राधान्य देणाऱ्या महिलावर साताऱ्यात हल्ला होणे दुर्दैवी राज्यात शिवरायांवर बेगडी प्रेम करणारी वाढली आहेत सोयीस्कर पद्धतीने शिवप्रेम दाखवीत आहेत. शिवरायांच्या नावापुढे छत्रपतीचा अट्टाहास करणारेच शिवरायांच्या छत्रपती होण्याला विरोध करत होते. बहुजनांच्या प्रेरणेचा काळा रंग प्रवीण गायकवाड यांना लागला आणि लांब गेलेले सर्व बहुजन एक झाले जनतेच्या विरोधाला, महाराष्ट्र धर्माला रोखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी वापरलेले क्षेपणास्त्र म्हणजे जनसुरक्षा कायदा आहे. भीमशक्ती-शिवशक्ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी. महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी आपण सर्वांनी लढायचं आहे.


महापुरुषांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या वेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यात आला या वेळी उल्हास पाटील, मानव कांबळे,सुरेश खोपडे, मारुती भापकर आदींनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर सुरेश सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्तावित मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव यांनी केले गणेश दहीभाते यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img