गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजवली आहे. मुरादनगर येथील एका महिलेवर तिच्या पतीने अवास्तव दबाव टाकून तिला सलग तासन्तास व्यायाम करायला भाग पाडले. कारण इतकंच की पतीला आपल्या पत्नीची शरीरयष्टी अभिनेत्री नोरा (Nora Fatehi) फतेहीसारखीच हवी होती.
पीडितेचा पती हा शारीरिक शिक्षणाचा शिक्षक असून त्याने पत्नीच्या नैसर्गिक सौंदर्याला कमी लेखत तिला सतत टोमणे मारले. इतकेच नव्हे तर “मी चुकीचं लग्न केलं, मला नोरा फतेहीसारखी पत्नी हवी होती,” असे बोलून तिचा मानसिक छळ केला.
रिपोर्टनुसार, आरोपी रोज पत्नीला तीन-तीन तास जीमला पाठवत असे. जर ती कमी वेळ व्यायाम करत असेल, तर त्या दिवशी तिला जेवणही नाकारलं जात असे. या अमानुष वागणुकीमुळे महिला प्रचंड त्रस्त झाली होती.
ही घटना प्रकाशात आल्यानंतर समाजात संतापाची लाट उसळली आहे. फाजील मोहाच्या अतिरेकामुळे एका महिलेला झालेला त्रास हा अत्यंत गंभीर प्रकार मानला जात असून आरोपीवर कडक कारवाईची मागणी होत आहे.