17.9 C
New York

Fridge Cigarette Trend : Gen Z चा डिजिटल स्मोक ब्रेक, पण आरोग्यासाठी धोक्याची घंटा!

Published:

आजच्या तरुणाईसाठी सोशल मीडिया म्हणजे केवळ मनोरंजनच नाही तर स्वतःला व्यक्त करण्याचं नवं व्यासपीठ आहे. त्यामुळे नवीन-नवीन ट्रेंड्स लगेच व्हायरल होतात. असाच एक भन्नाट ट्रेंड अलीकडे TikTok वरून जोरात पसरला आहे – नाव थोडं वेगळं ‘Fridge Cigarette’.

यात सिगारेटचा धूर नाही, पण स्टाइल मात्र तशीच! Gen Z तरुण फ्रिजमधून थंडगार Diet Coke काढतात, ती उघडताना जणू एखाद्या सिगारेटला आग लावल्यासारखं अ‍ॅक्टिंग करतात आणि मग एक मोठा घोट घेतात. कॅन उघडतानाचा आवाज, त्यातलं फिज्झ आणि थंड घोट यामुळे त्यांना रिलॅक्स वाटतं. त्यांच्या भाषेत हा एकप्रकारचा “डिजिटल स्मोक ब्रेक” आहे. निकोटिनशिवाय, धुराशिवाय पण तितकाच सुकून!

पण या ‘कूल’ वाटणाऱ्या ट्रेंडमागे काही गंभीर धोके दडले आहेत

दातांसाठी हानिकारक: डाएट कोकमधील आम्ल दातांची एनॅमल कमजोर करतात.

कृत्रिम गोड पदार्थ: Aspartame आणि इतर स्वीटनर्स दीर्घकाळ आरोग्य बिघडवू शकतात.

हृदयविकाराचा धोका: काही संशोधनात डाएट ड्रिंक्सचा हृदयविकार, डायबिटीज व स्ट्रोकशी संबंध आढळतो.

कॅफीनची समस्या: जास्त कॅफीनमुळे अनिद्रा, घबराट, डिहायड्रेशन वाढू शकतं.

पचन त्रास: कार्बोनेशनमुळे गॅस व फुगलेपणाची समस्या वाढते.

म्हणूनच, ‘Fridge Cigarette’ हा ट्रेंड सोशल मीडियावर मजेदार वाटला तरी दीर्घकाळासाठी शरीरावर ताण आणणारा आहे. त्यामुळे त्याकडे फक्त मनोरंजन म्हणून पाहणं आणि त्यात गुंतून न पडणं हेच सर्वात शहाणपणाचं पाऊल ठरेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img