पोलिसांनी प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या (Elvish Yadav) घरावर गोळीबार करणाऱ्याला जेरबंद केले आहे. पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर तो जखमी झाला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबार करणाऱ्या इशांत उर्फ इशू गांधी आरोपीचे नाव असे आहे. काही दिवसांपूर्वी एल्विशच्या यादवच्या घरावर गोळीबार झाला होता. गोळीबार झाला तेव्हा एल्विश घरी नव्हता. त्याच्या घरातील काही सदस्य होते. गोळीबार करणारे आरोपी दुचाकीवरुन आले होते.
या घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केला. इशांत गांधी असे या आरोपीचे नाव आहे. तो फरीदाबाद येथील जवाहर कॉलनी येथील रहिवासी आहे. इशांतने पोलिसांवर ऑटोमॅटिक पिस्तुलातून अर्धा डझनपेक्षा जास्त गोळ्या झाडल्या. पोलिसांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
Elvish Yadav भाऊ गँगने घेतली होती हल्ल्याची जबाबदारी
एल्विश यादवच्या (Elvish Yadav) घरी झालेल्या गोळीबाराची जबाबदारी भाऊ गँगचे (Bhau Gang) गुंड नीरज फरीदपूर आणि भाऊ रिटोलिया यांनी घेतली होती. त्यांनी ही सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली होती. गोळीबाराचे कारण देताना त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं की बेटिंग अॅपची जाहिरात करून एल्विशने अनेक घरे उद्ध्वस्त केली आहेत. सोशल मीडिया पोस्टची पुष्टी झालेली नाही.
Elvish Yadav नक्की काय घडलं होतं
एल्विशच्या वडिलांनी 25 ते 30 राउंड गोळ्या हल्लेखोरांनी चालवल्या असा दावा केला. 10 ते 12 राउंड गोळीबार झाल्याचे पोलिसांनी मात्र सांगितले.ही घटना गुरुग्राम पोलिसांच्या माहितीनुसार पहाटे साडेपाच वाजता घडली. तीन लोक दुचाकीवरून आले. दोघांनी यातील गोळीबार केला. फायरिंग घराच्या ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरवर झाली. एल्विश स्वतः तिसऱ्या मजल्यावर राहतो. गोळीबार झाला तेव्हा घरातील सदस्य आणि केयरटेकर घरात होते.