15.9 C
New York

Asia Cup 2025 : भारतीय संघ जर्सीवरून ड्रीम11चा लोगो गायब होणार?

Published:

आगामी आशिया कप (Asia Cup)2025 साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली असून, स्पर्धा 9 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये टी20 स्वरूपात रंगणार आहे. या वेळी 8 संघ विजेतेपदासाठी उतरणार असून, पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष भारतावरच असेल. मात्र, यावेळी भारतीय संघाच्या जर्सीत एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही काळापासून जर्सीवर दिसणारा टायटल स्पॉन्सर ड्रीम11 याचा लोगो कदाचित यंदा दिसणार नाही. कारण, केंद्र सरकारने नुकतंच ‘द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल 2025’ संसदेत मंजूर केलं आहे. या कायद्यानुसार पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या फॅन्टसी गेम्सवर बंदी येणार आहे. ड्रीम11 हे अशा व्यवसायात सर्वात मोठं नाव असल्याने त्यांचा धंदाच थांबण्याची शक्यता आहे.

2023 साली बीसीसीआय आणि ड्रीम11 (Dream 11) यांच्यात तब्बल 358 कोटींचा टायटल स्पॉन्सरशिप करार झाला होता, जो 2026 पर्यंत चालणार होता. या करारामुळे भारतीय संघाच्या जर्सीवर तसेच ट्रेनिंग किटवर ड्रीम11चं नाव झळकत होतं. पण नवीन कायद्यामुळे कंपनीला माघार घ्यावी लागल्यास करार वेळेआधीच संपुष्टात येऊ शकतो.

जर खरंच ड्रीम11ने आशिया कपपूर्वी स्पॉन्सरशीप थांबवली आणि बीसीसीआयला नवा स्पॉन्सर मिळाला नाही, तर भारतीय संघाची निळी जर्सी यावेळी कोणत्याही व्यावसायिक लोगोशिवाय मैदानावर दिसेल. अशा परिस्थितीत बोर्डाला कोट्यवधींचं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं.

10 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताचा पहिला सामना यजमान यूएईविरुद्ध खेळला जाणार आहे, आणि तेव्हाच हा बदल प्रत्यक्षात दिसून येईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img