शुक्रवारी (22 ऑगस्ट) सकाळी संसद भवनाच्या सुरक्षेत भंग झाल्याची माहिती समोर आली आहे. (Parliament Security Breach) एका व्यक्तीने झाडाच्या साहाय्याने भिंतीवरून उडी मारून संसद भवनात प्रवेश केल्याचे समजते आहे. या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची ओळख अद्याप उघड झालेली नाही. या व्यक्तीने सकाळी साडे 6 वाजताच्या सुमारास संसद भवनात प्रवेश केला. आरोपी व्यक्ती रेल भवनच्या बाजूने भिंतीवरून उडी मारून नवीन संसद भवनाच्या गरुड गेटवर पोहोचला. संसद भवनात उपस्थित असलेल्या सुरक्षा दलाने आरोपीला पकडले असून त्याची चौकशी करत आहे. सध्या सुरक्षा दल हे व्यक्ती संसद भवनात का प्रवेश करू इच्छित होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुरक्षा भेदून संसदेच्या आवारात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी केली जात आहे. आरोपी संसदेच्या गरुड गेटवर पोहोचला होता, तिथून सुरक्षा दलांनी त्याला पकडल्याचे सांगितले जात असून, संसद भवन परिसरात ही व्यक्ती कोणत्या उद्देशाने घुसली होती हे चौकशीअंती समोर येईल. ही घटना सकाळी ६:३० वाजता घडल्याचे सांगितले जात असून, रेल भवनच्या बाजूने असलेल्या भिंतीवरून संबंधित आरोपीने उडी मारून संसद भवनात प्रवेश केला. त्यानंतर संबंधित व्यक्ती गरुड द्वार येथे पोहोचली मात्र, सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान दाखवत त्याला अटक केली.
Parliament Security Breach सुरक्षेत चूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही
संसदेच्या सुरक्षेत त्रुटी असल्याचे प्रकरण उघडकीस येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 13 डिसेंबर 2024 रोजी काही लोकांनी संसद भवनात प्रवेश करत पिवळ्या गॅसच्या नळकांड्या फोडल्या होत्या. तसेच जोरदोरात घोषणाबाजीही केली होती. या घटनेवेळी लोकसभेत काही महत्त्वाचे मंत्री आणि खासदार उपस्थित होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी मनोरंजन डी, सागर शर्मा, अमोल धनराज शिंदे, नीलम आझाद, ललित झा आणि महेश कुमावत या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.