16.7 C
New York

Donald Trump Administration : साडेपाच कोटी परदेशी ट्रम्पच्या रडारवर, ‘या’ गोष्टी आढळल्यास व्हिसा होणार रद्द

Published:

सध्या अमेरिकेत राहणाऱ्या 5.5 कोटींहून अधिक परदेशी नागरिकांच्या (Donald Trump Administration) व्हिसांचा आढावा घेतला जात आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द करता यावेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. परराष्ट्र विभागाच्या म्हणण्यानुसार, सर्व अमेरिकन व्हिसा धारकांवर सतत लक्ष ठेवले जाते आहे. जर एखादा व्हिसाधारक नियमांचे उल्लंघन करताना आढळला तर त्याचा व्हिसा रद्द केला जाईल आणि त्याला त्याच्या देशात पाठवले जाईल.

व्हिसाधारक जेव्हा निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त काळ अमेरिकेत राहतात तेव्हा त्यांना अपात्र मानले जाते. सार्वजनिक सुरक्षेसाठी धोका निर्माण करणाऱ्या, गुन्हेगारी किंवा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेले किंवा कोणत्याही दहशतवादी संघटनेला मदत करणाऱ्या व्हिसा धारकांवर त्वरित कारवाई केली जाईल.

Donald Trump Administration नियम अधिक कठोर

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) जानेवारीमध्ये शपथ घेतली होती. तेव्हापासून ट्रम्प प्रशासन अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरित, विद्यार्थी आणि प्रवासी व्हिसाधारकांना हद्दपार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. व्हिसाधारकांची ही पुनरावलोकन प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहील. ट्रम्प प्रशासन व्हिसा अर्जदारांवर सतत निर्बंध लादत आहे. यामध्ये सर्व व्हिसा अर्जदारांना वैयक्तिक मुलाखत देणे अनिवार्य करणे समाविष्ट आहे.

पूर्वी व्हिसाधारकांची चौकशी फक्त अशा विद्यार्थ्यांवर केंद्रित होती जे पॅलेस्टाईन समर्थक किंवा इस्रायलविरोधी कारवायांमध्ये सहभागी आहेत. परंतु आता ही चौकशी आणखी वाढविण्यात आली आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पुनरावलोकन प्रक्रियेदरम्यान, सर्व व्हिसाधारकांचे सोशल मीडिया अकाउंट तपासले जातील. त्यांच्या देशात त्यांच्यावर काही गुन्हा दाखल झाला आहे का, अमेरिकेत वास्तव्यादरम्यान त्यांनी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले आहे का? हे देखील पाहिले जाणार आहे.

Donald Trump Administration विद्यार्थी व्हिसा धडाधड रद्द

परराष्ट्र विभागाने म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासनाने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट व्हिसा रद्द केले आहेत. यावर्षी जवळजवळ चारपट जास्त विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. ट्रम्प पुन्हा अध्यक्ष झाल्यानंतर 6 हजारांहून अधिक विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. यातील बहुतेक प्रकरणे प्राणघातक हल्ला, मद्यपान करून गाडी चालवणे आणि दहशतवादाला पाठिंबा देण्याशी संबंधित होती.

अमेरिकेत मुदतीपेक्षा जास्त काळ राहिल्यामुळे किंवा अमेरिकेच्या कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले. या 6 हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे 4 हजार विद्यार्थ्यांचा व्हिसा कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे रद्द करण्यात आला आहे. दहशतवादाशी संबंधित कारणांमुळे सुमारे 200-300 व्हिसा रद्द करण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img