16.4 C
New York

Raj Thackeray : कोण जैन लोक कबुतरावर बसून फिरायला जातात?; उंदराचं उदाहरण देत राज ठाकरेंनी नवी वात पेटवली

Published:

जैन लोक कोण आहेत, कबुतरावर जे बसून फिरायला जातात? असा खोचक प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित करत काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. राज ठाकरेंनी माणसं मेली तर चालतात असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. दादरच्या कबुतर खान्याचा प्रश्न राजकीय होता. राज ठाकरे (Raj Thackeray) रिस्पॉन्स त्याला पण मिळाला नाही, रिस्पॉन्स कुठे द्यायया हे आम्हाला कळत असेही म्हणाले. ते वर्षा बंगल्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

Raj Thackeray उंदीर गणपतीचं वाहन म्हणून घरात ठेवतो का?

राजकीय वाद कबुतरखान्यांच्या मुद्द्यावरुन पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आम्हाला कुठे प्रतिसाद द्यायचा, हे कळते. काही जणांना कबुतरांचा (Pigeons) मुद्दा वाद होईल, अशा पद्धतीनेच लावून धरायचा होता. मात्र, त्यांना लक्षात आले की, आमच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. तुमच्या घरात चार उंदीर झाले. त्याचं काय करता तुम्ही… गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का. नाही ना. असे उदाहरण देत राज ठाकरेंनी जैन समाजावर हल्लाबोल केला.

ठाकरेंनी कोण जैन लोकं असे आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात. जैन लोक कोण आहेत, कबुतरावर बसून जे फिरायला जातात? असा खोचक प्रश्न उपस्थित करत काय त्या कबुतरांचं. कबूतर मेले नाही पाहिजे. माणसं मेली तर चालतात. रेल्वेखाली माणसं जातात, खड्ड्यांमध्ये माणसं जातात. माणसांपेक्षा कबूतरं महत्त्वाचे आहेत. तो राजकीय विषय आहे. त्यांना राजकारण करायचं होतं. पण त्यांना कळलं की रिस्पॉन्स मिळत नाही. आम्हाला रिस्पॉन्स द्यायचा नव्हता. ते विषय भरकटवतात, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img