16.4 C
New York

Indias Rampur signature : भारताची शान ठरलेली ‘रामपूर सिग्नेचर रिझर्व्ह’ सर्वात महागडी ?

Published:

भारतासह जगभरात व्हिस्कीला (Whiskey) मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सच्या रांगांमध्ये भारतातील एका खास व्हिस्कीने मात्र जागतिक स्तरावर आपली वेगळी छाप सोडली आहे. ही व्हिस्की म्हणजे उत्तर प्रदेशातील रामपूर येथे तयार केलेली ‘रामपूर सिग्नेचर रिझर्व्ह’, जी देशातील सर्वात महागडी सिंगल माल्ट व्हिस्की म्हणून ओळखली जाते. ‘रामपूर सिग्नेचर रिझर्व्ह’ (Rampur signature) ही सुप्रसिद्ध रॅडिको खेतान कंपनीने त्यांच्या रामपूर डिस्टिलरीत तयार केली.

या डिस्टिलरीचा इतिहास 1943 सालापर्यंत पोहोचतो. विशेष व्हिस्कीच्या फक्त 400 बाटल्याच बाजारात आणण्यात आल्या. प्रत्येक बाटलीची किंमत तब्बल ५ लाख रुपये ठेवण्यात आली होती. एवढी जास्त किंमत असूनही या सर्व बाटल्या अल्पावधीतच विकल्या गेल्या.

रामपूर डिस्टिलरीच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ही खास व्हिस्की सादर करण्यात आली होती. भारतातील बदलत्या हवामानामुळे ही व्हिस्की प्रथम अमेरिकन ओक बॅरल्समध्ये ठेवण्यात आली. त्यानंतर अधिक उत्तम चव मिळावी यासाठी तिला जेरेझ, स्पेन येथील PX शेरी बट्समध्ये मॅच्युअर केले गेले. प्रत्येक बाटलीवर कंपनीचे अध्यक्ष आणि मास्टर मेकर डॉ. ललित खेतान (DR. Lalit Khetan) यांची स्वाक्षरीही देण्यात आली होती.

रामपूरच्या इतर व्हिस्की प्रकारांच्या किंमती:

रामपूर डबल कास्क – सुमारे ₹८,५००

रामपूर पीएक्स शेरी एडिशन – ₹१२,०००

रामपूर सिलेक्ट – ₹१४,०००

रामपूर आसवा – ₹१०,९९०

रामपूर जुगलबंदी (प्रीमियम प्रकार) – ₹४०,०००

सध्या ‘रामपूर सिग्नेचर रिझर्व्ह’ बाजारात उपलब्ध नाही, कारण तिच्या सर्व बाटल्या आधीच विकल्या गेल्या आहेत. तरीसुद्धा ही व्हिस्की भारताच्या प्रीमियम दारू उद्योगातील ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img