सात ते आठ दिवसांपासून राज्यात मागील धुमाकूळ घालत असलेला (Maharashtra Rain Update) पाऊस आता ओसरू लागला आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा (IMD Rain Alert) ठरत आहे. विभागाने पावसाचा जोर गुरुवारपासून कमी होईल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार काल दुपारपासूनच राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. आज सकाळी ढगाळ हवामान मात्र कायम आहे.
मागील चार दिवसांच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. अनेक भागात सूर्यदर्शनही झालं. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती. आज पाऊस विश्रांती घेईल काही ठिकाणी अधूनमधून हलका ते मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने (Weather Forecast in Maharashtra) व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
मागील आठवड्यापासून राज्यात मुसळधार पाऊस होत होता. अरबी समु्द्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अतिवृष्टी झाली. या पावसाचा जोर मुंबईत सर्वाधिक होता. रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांत तुफान पाऊस झाला. पुण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. नागरिकांच्या घरात पाणी शिरले. रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. त्यामुळे रेल्वे रद्द कराव्या लागल्या. शाळा आणि महाविद्यालये, सरकारी निमसरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करावी लागली.
आता मात्र आजपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. मुंबई, ठाणेसह अन्य जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव कमी राहील. कुलाबा केंद्रात बुधवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेवाज पर्यंतड 0.4 मिमी तर सांताक्रूझ येथे 9.8 मिमी पावसाची नोंद झाली. राज्यात पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
Maharashtra Rain Update नाशिकमध्ये नदी पात्र फुगलं
गोदावरी नदीच्या पातळीत नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने झपाट्याने वाढ होत आहे. पानवेली रामकुंड परिसरात वाहून आल्याने परिसर व्यापला आहे. पाणी सध्या 2,557 क्युसेक वेगाने सोडण्यात येत असून पुढील काही तासांत विसर्ग वाढवला जाणार आहे. त्यामुळे गोदाकाठच्या मंदिरांना पाणी लागण्यास सुरुवात झाली आहे.सातारा जिल्ह्यात पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. महाबळेश्वर-पाचगणी परिसरात आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोयना, धोम-बलकवडी, उरमोडी आणि तारळी धरणांतून विसर्ग करण्यात आला आहे.