16.4 C
New York

Hina Khan Rocky Jaiswal : हिना खानच्या कठीण काळात रॉकी जयस्वालचा ठाम आधार रॉकीने अफवांवर दिले स्पष्ट उत्तर

Published:

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिला कॅन्सरचे निदान झाले आणि उपचार सुरू असतानाच तिने तिच्या दीर्घकाळच्या प्रियकरासोबत लग्न केले. या काळात हिनाचा नवरा रॉकी जयस्वाल (Rocky Jaiswal) तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला.

मात्र, लग्नानंतर रॉकीवर लोकांकडून टीका होऊ लागली. काहींनी त्याच्यावर हिनाच्या पैसा, पद आणि प्रसिद्धीचा फायदा घेतल्याचा आरोप केला. यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रॉकी म्हणाला, “हो, हिना स्टार आहे, तिच्यासोबत असल्याने मला वेगळा सन्मान मिळतो, पण आमचे नाते फक्त यावर आधारलेले नाही. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्यासोबत घालवलेला वेळ. मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो.”

रॉकीने आणखी सांगितले की, हिनाचे नाव मोठे असल्यामुळे त्याला काही सुविधा मिळतात, पण त्यातून असुरक्षित वाटण्याऐवजी त्याला अभिमानच वाटतो. “मी माझ्या मेहनतीतून कमावतो, हिनाचे यश वेगळे आहे. आम्ही दोघे एकत्र आहोत कारण आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, प्रसिद्धीमुळे नाही,” असे तो स्पष्टपणे म्हणाला.

हिनाच्या उपचारांदरम्यान अनेकदा रॉकी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये दिसला आहे. चाहत्यांनीही या नात्यातील त्याचा आधार आणि प्रेम पाहिले आहे. हिना खान सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांना या प्रवासात अपडेट्स देत असते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img