16.1 C
New York

Artificial Intelligence : बनावट आवाज, डीपफेक व्हिडिओ अन् वेबसाइट्स.. सावध व्हा, AI ही देऊ शकतो दगा!

Published:

एआय आजच्या काळातील सर्वांत मोठी क्रांती आहे. एआय या प्रगत तंत्रज्ञानाच्या (Artificial Intelligence ) आगमनाने सर्वांचे जीवन सोपे जरी झाले असले तरी या तंत्रज्ञानाचे काही तोटे देखील आहेत याची जाणीव आपल्याला असायलाच हवी. एआयच्या मदतीने फसवणुकीचे अनेक प्रकार आता उघडकीस येत आहेत. स्कॅमर एआय तंत्रज्ञानाचा वापर अनेक प्रकारे करून फसवणूक करू शकतात. यांमध्ये नवीन प्रकारचे सॉफ्टवेअर तयार करून डिव्हाईस हॅक करण्यापासून ते जवळच्या व्यक्तीचा आवाज क्लोन करून आर्थिक फसवणुकीपर्यंत अनेक प्रकारांचा समावेश होतो. सामान्य लोकांना लक्ष्य करणारे स्कॅमर बहुतेकदा जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाचा वापर करतात. या फसवणुकीच्या प्रकारांबद्दल थोडक्यात माहिती घेऊया..

Artificial Intelligence व्हॉइस क्लोनिंग स्कॅम

काही एआय टूल्स एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याच्या अगदी छोट्या व्हिडिओवरून आवाज क्लोन करण्यात पटाईत असतात. स्कॅमर तुमच्या जवळच्या व्यक्तींचा आवाज कॉपी करून तुम्हाला पॅनिक कॉल करून पैसे मागू शकतात. असे फसवणुकीचे प्रकार बहुतेकदा वृद्धांसोबत घडताना दिसतात. कारण वृद्ध व्यक्तींना या प्रकाराद्वारे फसवणे सोपे जाते.

Artificial Intelligence डीपफेक व्हिडिओ स्कॅम

डीपफेक व्हिडिओ हे एआय जनरेटेड खोटे व्हिडिओ असतात. ज्यातील घटना, व्यक्ती, परिस्थिती मात्र अगदी खऱ्या असल्यासारख्याच भासतात. एखाद्या मूळ व्हिडिओमध्ये फसवणुकीसाठी आवश्यक ते फेरफार करून आणि व्हाईस क्लोनिंग तंत्राचा वापर करून डीपफेक व्हिडीओ तयार केले जातात. या व्हिडीओंचा वापर नंतर टार्गेटेड व्यक्तींकडून पैसे उकळण्यासाठी केला जातो. या स्कॅमद्वारे स्कॅमर विशेषतः महिलांना लक्ष्य करताना दिसून येतात.

Artificial Intelligence एआय-निर्मित वेबसाइट्स

स्कॅमर एआयचा वापर करून फेक वेबसाइट्स तयार करतात. त्यानंतर ईमेलद्वारे किंवा सोशल मीडिया मेसेजद्वारे पोस्टमधून या वेबसाइट्स टार्गेटेड व्यक्तींसाठी प्लांट केल्या जातात. या लिंक्समध्ये तुमच्या आवडत्या कपड्यांच्या ब्रॅंड्सवरील डिस्काउंटपासून इतर अनेक लोकप्रिय ऑफर्सच्या माहितीचा समावेश असू शकतो. या फेक वेबसाइट्सवर क्लिक केल्यानंतर स्कॅमर तुमच्या फोनमधील सर्व माहिती, पेमेंट तपशील चोरू शकतात आणि ती माहिती विकून पैसे कमवू शकतात किंवा तुमचे खातेही साफ करू शकतात.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img