राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीने चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचे शिंदेंच्या शिवसेनेने स्वागत केले आहे. रामदास कदम आणि मंत्री उदय सामांत यांनी म्हटले आहे की, राज ठाकरे जर महायुतीत येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीने चर्चांना उधाण आले आहे.
दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूचा पराभव झाला. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला भोपळाही फोडता आला नाही. या निवडणूक निकालानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवरुन तर्क-वितर्क लावले जात आहेत. आगामी मुंबई महानगर पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना राज ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेणे याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
शिवसेना (शिंदे) नेत्यांनी या भेटीचे स्वागत केले असून राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटून महायुतीत येणार असतील तर त्यांचे स्वागत असल्याचे माजी मंत्री रामदास कदम आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची गुरुवारी (21, ऑगस्ट) सकाळी साधारण नऊ ते साडे नऊ वाजताच्या दरम्यान ही भेट घेतली. साधारण तासभर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. या भेटीचे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने स्वागत केले आहे.
Raj Thackeray मनसे – ठाकरे गट युतीची चर्चा फिस्कटणार?
राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षा येथे देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. बेस्ट पतपेढी निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम या भेटीवर म्हणाले की, मी राज ठाकरे यांना आधीच सांगितले होते की तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत जाऊ नका. उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत त्यांनी हे अनुभवले आहे. आगामी काळात महानगर पालिका निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटून महायुतीत येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे रामदास कदम म्हणाले.मुंबई रियल इस्टेटमहाराष्ट्र नोकरी
Raj Thackeray मंत्री उदय सामंत काय म्हणाले?
शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री हे विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेटत असतात. मुंबईत सलग दोन, तीन दिवस पाऊस होता. मुंबईकरांच्या विविध प्रश्नांसाठी ही भेट असण्याची शक्यता आहे, असे उदय सामंत म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील भेट ही राजकीय असेल तर या भेटीबद्दल ते दोन्ही नेतेच सांगू शकतील असेही सामंत म्हणाले.
उद्धव ठाकरेंसोबत आल्यामुळे सगळा मराठी माणुस आमच्यासोबत येईल, असे राज ठाकरे यांना वाटले होते. मात्र त्यांचा प्रयोग फसला, असेही शिवसेना नेत्यांनी म्हटले. उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीला बेस्ट मधील पतपेढी निवडणुकीत भोपळा मिळाला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी राज ठाकरे हे काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.