महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानाबद्दल चुकीची आकडेवारी दिल्यावरुन मतचोरीचा आरोप करणाऱ्या सीएसडीएसवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर मतचोरीचा आरोप केला होता. ही आकडेवारी सीएसडीएस संस्थेने दिली होती. सीएसडीएसचे संचालक संजय कुमार (Sanjay Kumar) यांनी महाराष्ट्रातील दोन मतदारसंघामध्ये मतदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची पोस्ट केली होती. संजय कुमार यांनी सोशल मीडियावरील ही पोस्ट आता डिलिट केली आहे. यावरुन पुन्हा राजकारण सुरु झाले आहे.महाराष्ट्र नोकरीमुंबई रियल इस्टेट
नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलिस स्टेशन आणि नाशिक जिल्ह्यात संजय कुमारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीची चुकीची आकडेवारी देऊन मतचोरीचा आरोप केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने ही तक्रार दाखल केली आहे. संजय कुमार यांनी त्यांची पोस्ट डिलिट करुन चुकीची माहिती दिल्याबद्दल माफी देखील मागितली आहे. दरम्यान राहुल गांधी आता माफी मागतिल का, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Sanjay Kumar राहुल गांधी सिरियल लायर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सीएसडीएसच्या आकडेवारीवरुन राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते. आमच्या निवडून आलेल्या सरकारवरही त्यांनी आरोप केले होते. मात्र राहुल गांधी यांनी ज्या संस्थेच्या आकडेवारीच्या आधारावर हे आरोप केले, त्या संस्थेचे संजय कुमार यांनी त्यांची आकडेवारी चूक असल्याचे सांगत माफी मागितली आहे. त्यामुळे आता त्या आकडेवारीवरुन आकांडतांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का, एवढाच प्रश्न आहे, असे म्हणत त्यांच्याकडून मला आपेक्षा नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राहुल गांधी हे एक प्रकारे सिरियल लायर आहेत, असा आरोप फडणवीसांनी त्यांच्यावर केला.
Sanjay Kumar संजय कुमार यांनी काय ट्विट केले होते?
लोकनीति-सीएसडीएस (सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज) ही संस्था समाजशास्त्र आणि राज्यशास्त्राच्या क्षेत्रात काम करते. या संस्थेचे संचालक संजय कुमार आहेत. संजय कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या तुलनेने कमी मतदान झाल्याचे म्हटले होते. 17ऑगस्टला त्यांनी यासंबंधीचे ट्विट केले होते. त्यात म्हटले होते की, महाराष्ट्रातील नागपूरमधील रामटेक आणि नाशिक जिल्ह्यातील देवळाली या दोन मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत मतदार कमी झाले.महाराष्ट्र नोकरी
4 लाख 66 हजार 203 मतदार रामटेकमध्ये 2024 लोकसभा निवडणुकीत होते. मतदारांची संख्या 2 लाख 86 हजार 931 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एवढी कमी झाली. संजय कुमार यांचे म्हणणे होते की या मतदारसंघात 1 लाख 79 हजार 272 मतदार अर्थात 38.45 टक्के मतदार कमी झाले.

संजय कुमार यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघाबद्दल म्हटले होते की, येथे 4 लाख 56 हजार 72 मतदार 2024 लोकसभा निवडणुकीवेळी होते. तर ही मतदासंख्या 2 लाख 88 हाजर 141 एवढी विधानसभा 2024 निवडणुकीत झाली. म्हणजे देवळालीमध्ये 1 लाख 67 हजार 931 अर्थात 36.82 टक्के मतदार कमी झाले होते. संजय कुमार यांनी मंगळवारी माफी मागत हे ट्विट डिलिट केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील मतदारांची तुलना करताना माझ्या टीमकडून आकड्यांची अदलाबदल झाली आणि चुकीचा डेटा समोर आला. त्यामुळे मी माफी मागतो आणि ट्विट डिलिट करत असल्याचे त्यांनी दुसरे ट्विट केले.