16.4 C
New York

BCCI : BCCI चा मोठा प्लान! श्रेयस अय्यर होऊ शकतो वनडे कर्णधार, शुबमन गिल T20 टीमच्या नेतृत्वासाठी चर्चेत?

Published:

आशिया कपच्या (Asia Cup) संघात स्थान न मिळालेला श्रेयस अय्यर लवकरच टीम इंडियात एका मोठ्या जबाबदारीसह पुनरागमन करू शकतो. रिपोर्ट्सनुसार BCCI त्याला वनडे संघाचं नेतृत्व देण्याचा गंभीर विचार करत आहे. “सरपंच साहेब” म्हणून ओळखला जाणारा अय्यर (iyer) 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपूर्वीच कर्णधारपद भूषवू शकतो.

दरम्यान, टेस्ट कॅप्टन बनवण्यात आलेल्या शुबमन गिलचं (Shubhamn Gill) नावही पुढील T20 कॅप्टनपदासाठी पुढे येत आहे. सध्या सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) T20 संघाचं नेतृत्व करत असला तरी BCCI आता तरुण कर्णधाराच्या शोधात आहे. गिलला आशिया कपसाठी उपकर्णधार बनवून BCCI ने आपला इरादा स्पष्ट केल्याचं म्हटलं जात आहे.

आशिया कपनंतर होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) भवितव्याबद्दल चर्चा होणार आहे. जर त्यांनी टेस्ट आणि T20 मधून निवृत्तीचा निर्णय घेतला, तर पुढील रणनितीचा मार्ग खुला होईल. त्यानुसार श्रेयस अय्यरला वनडे आणि शुबमन गिलला T20 कॅप्टन बनवण्याची शक्यता अधिक बळकट होते.

BCCI चं म्हणणं आहे की आजच्या क्रिकेटमध्ये एका खेळाडूला तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधार म्हणून सांभाळणं कठीण आहे. त्यामुळे प्रत्येक फॉर्मेटसाठी स्वतंत्र नेतृत्व देण्याच्या तयारीत बोर्ड आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img