भारतीय महिला संघाने अलीकडच्या इंग्लंड दौऱ्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवला होता. इंग्लंडला (England) T20 आणि वनडे मालिकेत हरवल्यानंतर, राधा यादवच्या (Radha yadav) नेतृत्वाखालील इंडिया ए महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला.
या दौऱ्यात सुरुवातीला भारताला मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलिया ए महिला संघाने T20 मालिकेत 3-0 असा दणदणीत विजय मिळवत भारताचा धुव्वा उडवला. पण त्यानंतर भारतीय (India) महिला ए संघाने वनडे मालिकेत जबरदस्त पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकून मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. तिसऱ्या वनडेत मोठ्या फरकाने पराभव झाला असला तरी मालिकेचं विजेतेपद भारताकडेच गेलं.
आता या दौऱ्याचा शेवट एका कसोटी सराव सामन्याने होणार आहे.
सामना: ऑस्ट्रेलिया ए महिला विरुद्ध इंडिया ए महिला (अनऑफिशियल टेस्ट)
तारीख: 21 ते 24 ऑगस्ट
ठिकाण: एलन बॉर्डर फिल्ड, ब्रिस्बेन
वेळ: भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरुवात, टॉस 4:30 वाजता
या सामन्यात भारताचं नेतृत्व पुन्हा राधा यादव करणार आहे, तर ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व ताहिला विल्सनकडे (Tahila Wilson) असेल. भारताला ही कसोटी जिंकून दौऱ्याची सांगता विजयाने करण्याची संधी आहे, तर कांगारू संघ मालिकेची रंगत वाढवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे.