16.4 C
New York

Aamir Khan – Jessica Hines : आमिर खानवर भावाचा धक्कादायक आरोप, जेसिका हाइन्ससोबतच्या नात्याची चर्चा पुन्हा रंगली?

Published:

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Amir Khan) पुन्हा एकदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याचा भाऊ फैजल खान (Faisal Khan) याने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमिरवर गंभीर आरोप करत त्याचे नाव ब्रिटिश लेखिका जेसिका (Jessica Hines) हाइन्ससोबत जोडले.

फैजलच्या मते, रीना दत्ता हिच्याशी लग्न झाल्यानंतरही आमिरचं जेसिकासोबत रिलेशन होतं आणि त्यांना एक मुलगाही आहे. या दाव्यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

जेसिका हाइन्स ही एक प्रसिद्ध लेखिका असून 1998 मध्ये तिने अमिताभ बच्चन यांच्यावर “लुकिंग फॉर द बिग बी” हे पुस्तक लिहिलं. त्यावेळीच तिची ओळख आमिरसोबत झाली होती, जेव्हा अभिनेता ‘गुलाम’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता.

2005 मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जेसिकाने आमिरसोबतच्या नात्याबद्दल बोलल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आमिरने या नात्यावर कधीच काही भाष्य केलं नाही. नंतर 2007 मध्ये तिने लंडनमधील एका व्यावसायिकाशी लग्न करून भारतीय फिल्म इंडस्ट्रीपासून अंतर ठेवले.

आता दोन दशकांनंतर पुन्हा एकदा आमिर-जेसिका प्रकरण चर्चेत आलं आहे. चाहत्यांमध्ये आमिरच्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच उत्सुकता असते आणि त्यामुळेच ही चर्चा पुन्हा हेडलाईन्समध्ये आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img