राज्यभरामध्ये सध्या सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. त्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी धरणांतून पाणी सोडल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. दुसरीकडे मंगळवारी मुंबईमध्ये चेंबूर ते भक्ती पार्क मार्गावर मोनोरेलमध्ये (Mono Rail) तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोरेल जागीच थांबली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील स्थितीची माहिती घेतली.
Ajit Pawar काय म्हणाले अजित पवार?
राज्यातील परिस्थितीवर आम्ही देखरेख करत आहोत. यामध्ये पुण्यातील खडकवासलामधून पाणी सोडल्याने पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी पीएमसी कमिशनर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणी जास्त असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे स्थलांतर करण्यास सुरूवात केली आहे. दुसरीकडे कोल्हापुरात पंचगंगा धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणच्या शाळांना सुट्ट्या दिल्या आहेत. पुणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. तिकडे वसई विरार देखील अनेक ठिकाणी पाण्याखाली गेला आहे. हे नैसर्गिक संकट आहे. यंत्रणा काम करीत आहे.
दरम्यान यावेळी अजित पवार यांनी मुंबईमध्ये चेंबूर ते भक्ती पार्क मार्गावर मोनोरेलमध्ये (Mono Rail) तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोरेल जागीच थांबली होती. यावर देखील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कोणीही मुद्दाम करत नाही. मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. त्यावरून कोणीही राजकारण करू नये. कुठेही दुर्लक्ष होणार नाही. याची काळजी आम्ही घेत आहोत. त्यानंतर आज सकाळपासून मोनोरेल पुन्हा पूर्वत सुरु आहे. असंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं आहे.