18.9 C
New York

Mumbai Rains Update : मुंबईत पावसाचा कहर! सरकारचा मोठा निर्णय

Published:

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग होत (Mumbai Rains Update) असल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी (18 ऑगस्ट) सुरु झालेल्या मुसळधार पावसाचा जोर दुसऱ्यादिवशी म्हणजेच मंगळवारी (19 ऑगस्ट) कायम राहिला. मंगळवारी पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळी 9 वाजता मुंबईच्या आकाशात प्रचंड प्रमाणात काळे ढग जमल्याचे दिसून आले. पावसामुळे सलग दुसऱ्यादिवशी पडणाऱ्या मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळाले. यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचेदेखील समोर आले. तर, दुसरीकडे मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वेसेवाही विस्कळीत झाल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

Mumbai Rains Update मुंबईकरांचे हाल

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईसह विविध भागांत पाणी साचले असून लोकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत मार्गक्रमण करावी लागत आहे. मुंबई तसेच उपनगरांप्रमाणेच ठाणे, डोंबिवली आणि कल्याणमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी (18 ऑगस्ट) दिवसभर पाऊस झाल्यानंतर संध्याकाळी थोडा वेळ पावसाने विश्रांती घेतली होती. पण, रात्रीपासून पुन्हा सुरु झालेला पाऊस मंगळवारी सकाळीही कायम आहे. गेल्या 24 तासांत मुंबई उपनगरांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. विक्रोळी परिसरात सकाळी 8.30 पर्यंत सर्वाधिक 255.5 मिमी पाऊस पडला. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, भायखळा, सांताक्रुज, जुहू, वांद्रे परिसरात देखील अतिवृष्टी झाली आहे.मुंबई रियल इस्टेट

Mumbai Rains Update रेल्वेसेवा खोळंबली

सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेला मोठा फटका बसला आहे. मध्य रेल्वेमार्गावरील घाटकोपर ते दादर परिसरात रेल्वे रुळांवर मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. तर माटुंगा रेल्वे स्थानकातील रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. मध्य रेल्वेमार्गावरील गाड्या तब्बल 40 ते 45 मिनिटे उशिराने धावत होत्या. हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेनही तब्बल 25 ते 30 मिनिटे उशिराने सुरु होत्या. या सगळ्याचा फटका सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेल्या नोकरदारांना बसला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img