17.9 C
New York

Mumbai Rain Update : मुंबई पावसाच्या तडाख्यात! शहर ठप्प, वाहतूक विस्कळीत, रेड अलर्ट जारी

Published:

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत आणि उपनगरांमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे (Mumbai Rain Update) सामान्य जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक सखल भाग जलमय झाले असून, वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. हवामान खात्याने आज मुंबईसह ठाणे, रायगड, वसई-विरार आणि कोकण परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील २४ तासांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईतील अंधेरी परिसरातील सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक रोखण्यात आली आहे. वीरा देसाई रोड परिसरात परिस्थिती अधिक गंभीर असून, कंबरेपर्यंत पाणी साचले आहे. दोन महागड्या गाड्या पाण्यात अडकल्या असून, घरं-दुकाने जलमय झाली आहेत.

दादरमधील हिंदमाता व टीटी परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने रस्ते अक्षरशः नद्यासारखे झाले आहेत. स्वामीनारायण मंदिर परिसर, सायन-पनवेल महामार्ग, तसेच वसई-विरारमधील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. वादळी वाऱ्यांसह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक देखील अडथळलेली आहे.

लोकल रेल्वे सेवा देखील या पावसामुळे विस्कळीत झाली असून, मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गांवरील गाड्या १५ ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. कल्याण, ठाणे, दादरसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर रुळांवर पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

१८ ऑगस्ट सकाळी ८ ते १९ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत मुंबई शहरात १८६.४३ मिमी, पूर्व उपनगरात २०८.७८ मिमी आणि पश्चिम उपनगरात सर्वाधिक २३८.१९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी ९:१६ वाजता ३.७५ मीटरची भरती झाल्याने पाणी उपसा करण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

महापालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले असून, अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img