17.9 C
New York

Heavy Rain : पावसामुळे शासकीय, खासगी कार्यालयांना देखील सुट्टीचा निर्णय

Published:

मुंबई महानगर पालिकेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (Heavy Rain) शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयाना आज (19 ऑगस्ट ) मुंबई आणि महानगर प्रदेश क्षेत्रात सुरु असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे सुटी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळपासून पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. सकाळी आठ वाजतापासून पावसाची जोरदार मुंबई आणि परिसरात कोसळत आहे. सकाळी नऊ वाजता सर्वत्र अंधारुन आले आहे. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आहे. मुंबईला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. आज सुरु असलेल्या धुवाँधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अतिमुसळधार पावसामुळे मुंबई महापालिका क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवावरील कर्मचारी तेवढे कामावर हजर असणार आहेत. तसेच अत्यावश्यक कामे असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या या निर्णायाचे पालन सर्व संबंधित कार्यालयाने करावे असे आवाहन करण्यात आले आहे.मुंबई पर्यटन

Heavy Rain मुंबई महानगर प्रदेशाला रेड अलर्ट

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. १८ ते २१ ऑगस्ट मुंबई, ठाणे, रायगड, पालघर येथे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवार पासून मुंबई आणि परिसरात पाऊस कोसळत आहे. सोमवारी पावसाचा जोर वाढला. मुंबईत चेंबूर येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. आज (19 ऑगस्ट) देखील पावसाचा जोर ओसरलेला नाही तर उलट सकाळी 9 वाजता मुंबईत अंधारुन आलं आहे. आजही अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट आहे. ठिकठिकाणी पाणी साचलं आहे, रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन समिती आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी आज मुंबईतील शासकीय, निमशासकीय आणि महापालिका आणि खासगी कार्यालयांना सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेने शाळा आणि महाविद्यालयांना कालच सुटी जाहीर केली. आज कार्यालयांनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहणार आहेत. खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक असेल तरच वर्क फ्रॉम करण्याची सूचना देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img